-
नर्तिके – NARTIKE
नाच आज खास मस्त रात्र नर्तिके धुंद फुंद जाहलेत गात्र नर्तिके नर्तनात तांडवी जपून नाच तू पातलेत सान मौन छात्र नर्तिके बाण सोडतेस कैक दांडियातुनी भासतेस तेजरूप क्षात्र नर्तिके नाचतात लक्ष लक्ष नर्तिका जरी भावतेस तूच एक मात्र नर्तिके कृष्ण श्याम नील वर्ण मेघ वर्षती सांडते भरून पूर्ण पात्र नर्तिके गझल अक्षरगण वृत्त (मात्रा २०)…
-
अगम्य – AGAMYA
तू नवल घडविले रे जे वाटले अगम्य शत्रुत्त्व राहिले ना झालेय आज धन्य हुलकावणीत गेला अज्ञात भूतकाळ केले गुन्हे गुलाबी ते वाटतात क्षम्य ते आठवू कशाला घडले न जे कधीच आहे भविष्य उज्वल मम् वर्तमान रम्य ज्यांच्यासवे मनाने मी जोडलेय मैत्र मोहांध ना मनुज ते दिलदार सैन्य वन्य मूर्तीतल्या अनामिक या वंदिते जिनास आत्म्यात ईश…
-
कट्यार (KATYAAR)
माझी अमूल्य काव्ये त्यांच्यात प्राण आहे हृदयात गाढ श्रद्धा लय सूर ताल आहे जे जे हवे हवेसे खेचून घ्यावयाला नजरेत चुंबकाची माया तिखार आहे शब्दात भाव भरता गझलेत नाचती ते नृत्यास अर्थ देण्या त्यांच्यात धार आहे मी घालतेन चिलखत तलवार म्यान केली मम् लेखणीच आता झाली कट्यार आहे जेथे गचाळ पाणी डबकी तळ्यात साठे पोचेल…
-
फेसाळत्या नशेचा FESAALHATYAA NASHECHAA
फेसाळत्या चहाचा जाता भरून प्याला फेसाळत्या दुधाचा आला कुठून प्याला खडकावरून धावे वेगे झरा खळाळे प्याला फेसाळत्या जलाचा घ्यावा पिऊन प्याला मैत्रीत प्रीत आहे प्रीतीत मैत्र आहे फेसाळत्या धुक्याचा गेला खिरून प्याला प्याले न मोजिले मी पेयात नाहले मी फेसाळत्या नशेचा उरला पुरून प्याला मम् शब्द जादुई हे बिजली तयांस घुसळे फेसाळत्या गझलचा येतो वरून…
-
पिंगाट – PINGAAT
झिंग जंग झिंगाट झिंग झिंग दौड चिंगाट झिंग नाच नाच पिंग्यात गोल झिंग डोल पिंगाट झिंग टांग टांग वाजेल टोल झिंग टिंग टिंगाट झिंग फाड फाड वेगात बोल झिंग फिंग फिंगाट झिंग घेतलेत शिंगावं तीस झिंग शिंग शिंगाट झिंग ढांग ढांग वाजीव ढोल झिंग मंग मिंगाट झिंग दाण दाण दन्नाट नाच झिंग भिंग भिंगाट झिंग…
-
तीस – TEES
प्रथम तू झोड तीस पेल कलम प्रथम तू ठोक तीस झेल कलम फुलवुनी मिथ्य ती खुळी मशाल प्रथम तू रोख ती सलेल कलम धर पुरी काजळी तुझ्या घरात प्रथम तू मोज तीस तेलकलम गझल जी दौडते अशी भरात प्रथम तू जोड ती सजेल कलम चल खरी भांग खास झोकण्यास प्रथम तू घोट तीस बेल कलम…
-
ब्रह्मांड अवघे – BRAMHAAND AVAGHE
जादुई शब्दात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे जादुई काव्यात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे जे हवे ते मिळविण्या मी कोष विणते दिव्या ऐसा जादुई कोषात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे नेणिवेतिल स्वप्न अंबर ओतते राशी धनाच्या जादुई स्वप्नात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे देह माझा एक चुंबक खेचुनी घेई सुखांना जादुई आत्म्यात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे मी “सुनेत्रा” जाणतेकी…