-
सुखदा – SUKHADAA
नवी खास वाटे गुणाची सुखदा खरा भाव जपते ऋणाची सुखदा किती सरळ आहे सलिलता मृदुता घडी मस्त घाले खणाची सुखदा म्हणे बाप भाऊ जणू फुल मधुरा म्हणुन वाट लावे तणांची सुखदा जळूसारखी जी घराला चिकटे तिला जाळ लावी पणाची सुखदा पुरे माज मस्ती उतरणे जरुरी खडा घाव घाली घणाची सुखदा लगावली – लगागा/ लगागा/ लगागा/ललगा/…
-
पान कोरे – PAAN KORE
पुन्हा पान कोरे कसे आज सुंदर कळ्यांचे फुलांचे खुले राज सुंदर फुलावी खुलावी नव्हाळी उषेची उन्हाने दवाचे नवे साज सुंदर गुलाबी रुपेरी हवा सागरीही तिची मी समुद्री निळी गाज सुंदर जशी बोट नादात कंपात चाले तसे अंतरात्म्यात आवाज सुंदर तुला आठवोनी धुके मुक्त विरुनी सुनेत्रात माझ्या उभे ताज सुंदर लगावली – लगागा/ लगागा/ लगागा/ लगागा/…
-
“ती” – “TEE”
मी पुण्याची शान आहे संस्कृतीचे पान आहे मी सुगंधी केवड्याचे प्रकृतीचे रान आहे मी तुझ्या सच्च्या सुखांनी दाटलेले गान आहे ऐकण्या गाणे तुझे मी तानसेनी कान आहे लेक माझा सावळा अन लेक गोरीपान आहे मी भुकेल्या मूक जीवा वाढलेले पान आहे स्वच्छ त्या हिरव्या चहाच्या मी कपाचा कान आहे केरळातिल श्यामसुंदर मी गुरूहुन सान आहे…
-
स्वर्ग – SWARG
किती मी किती मी सुखे गात आहे दवाच्या तुषारे उभी न्हात आहे हवे ते हवेसे मला नित्य लाभे उणे ना कशाचेच स्वर्गात आहे मला स्वर्ग दिसतो तुम्हा स्वर्ग दिसतो तिथोनीच मोक्षास मी जात आहे फुलाया ग जीवा असा गंध देते जणू केवड्याची खरी पात आहे तुझ्या कैक वचनात साऊल गाणी जशी माय माझी पिता तात…
-
आभाळ – AABHAAL
मातीत मळून आलंय आभाळ भरून आलंय आभाळ ढगास ओढत वीजेस धरून आलंय वीजेस धुमार सौरभ अर्पून सजून आलंय रंगीत फुग्यास कोंडत वायूस चिरून आलंय पुत्रात चिराग दीपक कन्येत लवून आलंय हर्षात भ्रमात नाचत वातात झुलून आलंय चष्म्यास स्वतःच फोडत इगोत जळून आलंय पुष्पात सुगंध चंदन रूपात खुलून आलंय स्थापून जिनास शांतित ब्रम्हास वरून आलंय दारात…
-
मणका – MANAKA
मणका माझा कणां पाठिचा नागिण कट्टर अनल जणू मस्तक माझे फडा दहाचा कृष्ण मेघना सजल जणू या मणक्याला लोंबकळूनी कैक जणांनी दगा दिला कुरकुरतो पण अजुन टिकोनी विश्वासाठी नवल जणू मणक्यावरती गझल उभी ही राज्य कराया जगावरी शिडीवरूनी कळस पूजन्या आतुरलेले कमल जणू अगीनगाडी मणक्यावरुनी आयटीत जाते ऐटीत ग धूर न ओके इंजिन पुष्पक विमान…
-
बगीरा – BAGIRAA
कसा यायचा तो उशीरा उशीरा म्हणे तोच येतो बगीरा उशीरा लगागा लगागा लगागा लगागा स्वतःलाच झापे समीरा उशीरा दिवाणी दिवाणा नवे स्वप्न दावी खरी भेटले मी शिशीरा उशीरा खरे सत्य सुंदर मला ठाव आहे कळा लागल्या मूढ पीरा उशीरा सुनेत्रात मधुरा शशांक सु मनाचे समवशरण गाठे फकीरा उशीरा अक्षरगण वृत्त — मात्रा २०