Tag: Ghazal in akshargan vrutta

  • मी तुझी नाही जरी रे – MEE TUZEE NAAHEE JAREE RE

    मी तुझी नाही जरी रे मी तुझी आहे सदा मौन मी आहे जरी रे बोलकी माझी अदा संपदेचा भार होता सावळ्या कायेस या चुंबिल्या मी पापण्या झुकवून माथा कैकदा गोष्ट साधी बोलते मी पण चढे पारा तुझा बोलताना तोल जातो साजना तव कैकदा रंगला होतास तू अन रंगली होती निशा आठवे मज चांदण्यांनी शिम्पलेली संपदा…

  • कंटकांचा हार झाला – KANTAKAANCHAA HAAR ZAALAA

    तरही गझल – कंटकांचा हार झाला मूळ गझल – घुसमटीचा केव्हढा सत्कार झाला गझलकार – राज पठाण घुसमटीचा केवढा सत्कार झाला आतला आवाज पुरता ठार झाला बोलले होते जरी ते बोचणारे बोचऱ्या त्या कंटकांचा हार झाला लेखणीने दाबता नाना कळांना शेर माझा वीजवाहक तार झाला वितळलेल्या भावनांना अर्थ देण्या गोठवुन पाल्हाळ तो मग सार झाला…

  • तुझ्याचसाठी अजून मारुत – TUZYYACH SAATHEE AJOON MAARUT

    तुझ्याचसाठी अजून मारुत झऱ्याप्रमाणे वहात आहे सळसळणाऱ्या रवात त्याच्या सजल घनांचा निवास आहे उधळित सुमने सुगंध झुलती कलरव पक्षी वनात करिती भरून वाहे तुडुंब दुहिता निळी नव्हाळी जलात आहे पहाट वारा झुळझुळणारा उडवित जाई बटा लतेच्या खट्याळ त्याच्या अदांवरी या गझल गुलाबी फिदाच आहे सुकून गेली कधी करपली मृदूल माझी जरी फुलेही सतेज पर्णी हटेल…

  • मला सापडे ती – MALAA SAAPADE TEE

    कळाया नव्याने मला सापडे ती सदा घोळ घाले तरी आवडे ती किती नाक अपरे नयन नीलकांती जणू बाहुली बोलते बोबडे ती तुझी बायको तिज कसे मी म्हणावे कधी सारवीते तुझे झोपडे ती तुला तीट लावे तुझी दृष्ट काढे तुला घालते अंगडे टोपडे ती बटा स्वैर उडता कुरळ कुंतलाच्या तया तेल भारीतले चोपडे ती जरी अर्घ्य…

  • हाक मी मारू कुणाला – HAAK MEE MAROO KUNAALAA

    हाक मी मारू कुणाला ज्ञात नव्हते अंतरी उमलूनही मी गात नव्हते माझियासाठीच रस्ता थांबलेला स्वच्छ इतुका पण पुढे मी जात नव्हते गरज होती एकमेका पाहण्याची त्याचवेळी मी तुझ्या नयनात नव्हते स्पंदने होती सुखाची गोठलेली दुःखही तेव्हा उभे देहात नव्हते हात मैत्रीचा धरावा एवढेही धैर्य तेव्हा भाबड्या हृदयात नव्हते कुरुप मी होते खरी की सुंदरी रे…

  • मी उभी कमळात – MEE UBHEE KAMALHAAT

    मी उभी कमळात सुंदर ओंजळी भरभरुन देण्या वाहणारी नीर धारा घागरी भरभरुन देण्या अंगणी धनधान्य सांडे अंबरातिल चांदण्यांसम हात दोन्ही सज्ज माझे पोतडी भरभरुन देण्या रेखिते मी काव्यचित्रे कृष्णवर्णी मौक्तिकांनी भावभरली शब्दसुमने टोकरी भरभरुन देण्या मी वडाचे बीज इवले भूवरी उगवून येते बहरते मी पसरते मी सावली भरभरुन देण्या अचुक तोले मी ‘सुनेत्रा’ खास असुनी…

  • खूप मस्त – KHOOP MAST

    खूप मस्त मस्त वाटतंय देह वस्त्र चुस्त वाटतंय देणं घेणं संपल्यावरच केलं सारं फस्त वाटतंय उरलं सुरलं देत आप-धन बरसतोय हस्त वाटतंय रागरंग ओळखतच मन घालतेय गस्त वाटतंय मेघ दाटलेत गगनभर विश्व अवघं सुस्त वाटतंय आम आदमीच फक्त इथं लावणार शिस्त वाटतंय का बरे कुणास आजपण काव्य माझं स्वस्त वाटतंय अक्षरगण वृत्त (मात्रा १४) लगावली…