Tag: Ghazal in akshargan vrutta

  • वीसचौदा – VEES-CHOUDAA

    आले नव्या क्षणांचे दमदार वीसचौदा ठोकेल पार क्षितिजी षटकार वीसचौदा गेले खिरून झरुनी बिंबात वीसतेरा गाठून मंगळाला येणार वीसचौदा हृदयास शुभ्रवर्णी छेडून तार जाता रंगात लक्ष सुंदर भिजणार वीसचौदा नाचे मयूर रानी फुलवून मोरपीसे त्यातील पीस आहे अलवार वीसचौदा काटे किती जुने ते असुदेत टोचणारे काढून त्यांस जखमा भरणार वीसचौदा फुलपाखरी मनाची स्वप्ने खरी कराया…

  • सरेल रात गात गात – SAREL RAAT GAAT GAAT

    भिजेल चिंब चांदण्यात सरेल रात गात गात नवीन सूर्य उगवताच सरेल रात गात गात जुने नवे स्मरून प्रेम बुडेल हृदय पूर्ण त्यात खिरेल नीर लोचनात सरेल रात गात गात हसेल पूर्व अंबरात झरेल नाद मंदिरात झुलेल वात पाळण्यात सरेल रात गात गात खगास जाग येत येत घुमेल शीळ वाटिकेत सुगंध भोर सावल्यात सरेल रात गात…

  • तूच शोध आज चूक – TOOCH SHODH AAJ CHOOK

    तूच शोध आज चूक तापवून आज भूक सांग फरक बघ म्हणून पोपटास आज शूक लूक काज शिवण टिपण लाव बटन आज हूक कर्म निर्जरा करून गाठलेस आज टूक गुच्छ हा बुके म्हणेल पुस्तकास आज बूक वृत्त – गाल, गाल, गाल, गाल.

  • भीत नाय मी कुणास – BHEET NAAY MEE KUNAAS

    सोक्ष मोक्ष लावण्यास भीत नाय मी कुणास पूर्ण सत्य सांगण्यास भीत नाय मी कुणास लोटुनी पुरात नाव लाट पोट फाडण्यास भोवऱ्यास भेदण्यास भीत नाय मी कुणास कुंडल्या बनावटी करून कैक छापतात त्या चुलीत जाळण्यास भीत नाय मी कुणास माझियात मनुज देव हडळ भूत राक्षसीण हे त्रिवार बोलण्यास भीत नाय मी कुणास मंगळात आगडोंब सांगता कुणी…

  • एकमेका सावरू – EKAMEKAA SAAVAROO

    बोचरी थंडी हिवाळी शीळ घाली पाखरू वारियाने वस्त्र उडता स्वप्न माझे पांघरू काचता दावे गळ्याला उखडुनी खुंटी तिची माळरानी धाव घेते धुंद अवखळ वासरू दाटते आभाळ जेंव्हा मौन घेते ही धरा वीज येता भेट घ्याया खडक लागे पाझरू पाहण्या उत्सुक असे मी मुग्धतेतिल गोडवा पावसाळी वादळाने तू नकोना बावरू फेक ती काठी ‘सुनेत्रा’ गावयाला मोकळे…

  • मशाल – MASHAAL

    मम भावना फुलांची उबदार शाल आहे कविता नि गीत यांची अलवार चाल आहे मज शेर हा सुचावा पण तूच तो टिपावा गझलेत तोच राजा दिवटी मशाल आहे जगण्यास मस्त गाणे लिहितात काव्य वेडे कसला लिलाव आता झुलतो महाल आहे मज भावली निळाई मग रंगली रुबाई सल मुक्तकात माझ्या कटुता जहाल आहे लय सूर चारुतेचा घन…

  • गरज – GARAJ

    गझल कसली बालिकाही गिरवते बाराखडी वाचताना भासतेही चांदण्यांची फुलझडी चांदणे फुलवीत जाते मुग्ध माझी भावना काव्य मग घेऊन येते रंगलेली गुलछडी गझल माझी मौन घेते लाविते दारा कडी शेर माझे कोंडलेले तापले काढा कडी तापल्यावर शब्द पुद्गल अर्थसुद्धा पांगले भाव सुंदर जाणणारी हीच ती असते घडी निर्जरेने प्राण माझा मोकळा झाल्यावरी गरज ना दारास माझी…