-
सुकण्ण – SUKANN
कंठ शंख आवाज पुणेरी नखऱ्याचा नव बाज पुणेरी झणक फणक मिरचीचा ठसका ऐक समुद्री गाज पुणेरी ढोल नगारे लखलाभ तुला वाजविते पखवाज पुणेरी गालांवर रक्तिमा स्वरांकित नयनांनमधली लाज पुणेरी सुकण्ण सळसळते दो बाहू सुनेत्रास सरताज पुणेरी
-
पत्री – PATREE
अक्षर मोती शिम्पल्यातले अक्षर पत्री टपटप झरले जीवांमधले भाव रुजाया पत्रावरती जलद बरसले कितीक पत्रे किती छप्परे दारे भिंती फळे जाहले वनी अंगणी कैक काफिये रदीफ इंजिन त्यास जोडले अलामतीला जपेन म्हणता चिद्घन चपलेचे कर जुळले
-
बकरी – BAKRI
बकरी म्हण वा तिला भाकरी पसंत खाण्या मला भाकरी बाकुर सारण काहीही भर उचल करंजी कला भाकरी लळा लागल्यावरती बकरी खाऊ म्हणते चला भाकरी देय बाहुली थापुन भाकर भाजतोय बाहुला भाकरी तांदुळ ज्वारी रागीचीही करून देते तुला भाकरी क्षुधा शमविते लोरी गाते दोन तागडी झुला भाकरी उदरभरण अबलांचे करण्या देह तपविते बला भाकरी
-
चिकित्सा – CHIKITSA
राजा अपुला वजीर व्हावा नको बोलका पोपट रे पंत उपाधी खरी खरी पण उपमा अस्सल खोपट रे राणी अपुली राणी असुदे राजासंगे तृप्त सुखी नको क्वीन चा वजीर हाजिर गा अंगाई थोपट रे शुद्धमतीने गझल लिहावी साच्यामधली मूर्त नको प्राकृत भाषा जिन वाणीची उधळे मिथ्या जो पट रे ऋषी मुनींच्या ऋद्धी सिद्धी देव दिगंबर ग…
-
सरसकट – SARSAKAT
नवीन कोरी फटफट भारी चाके हलती लटलट भारी अकबर बिरबल खाशी जोडी गुजगोष्टींची वटवट भारी यती भंगाची कशास चिंता नील गगन धरती पट भारी सोळा मात्रा मोज सरसकट पाणवठयावर घट घट भारी कुठुन शब्द सरसहा पातला कोड्यामध्ये किचकट भारी कोड पाच शेरांचे जमले शेर सहावा गळवट भारी भरून काठोकाठ वाहतो शुद्ध जलाने पनघट भारी हत्तीच्या…
-
बोणी – BONEE
हिडीस चाळे करता कोणी का लावू मी कुणास लोणी मम गझलांनी भरली पोती डांसांची जड उचला गोणी रत्नत्रय हृदयात वसाया दशलक्षण सोपान त्रिकोणी पेरूवाली आली दारी दे चिल्लर अन कर तू बोणी सोनु सुनेत्रा गुण सोनेरी काहीही लिव सोनी सोणी
-
ओटी – OTI
मंगलमय मन संथ सावळी कृष्णामाई तू ग्रामस्थांची कुलस्वामिनी कृष्णामाई तू अष्टक देण्या भावफुलांनी कुमारिका आल्या प्रीतीने भर निसर्ग ओटी कृष्णामाई तू गवार भेंडी खिरा काकडी रक्तिमा साखरी कलिंगडातिल सत्त्व राखशी कृष्णामाई तू मुळा मुठा पवना कावेरी इंद्रायणी कऱ्हा गंगा नीरा झेलम तापी कृष्णामाई तू डोंगरातले निर्झर झरती बावखोल भरती मुक्त गझाला अभयारण्यी कृष्णामाई तू घटप्रभा…