Tag: Ghazal in maatraa vrutta

  • गांधीटोपी – “Gandhi cap”

    वादी वा प्रतिवादी असुदे काव्यकला मम साधी असुदे साध्य कराया इच्छित मुक्ती आसन भूमी गादी असुदे तलम जरी मलमलचा कुर्ता गांधीटोपी खादी असुदे मित्र चाहता नसेल माझा गझलेचा पण नादी असुदे शब्दांची गर्दी पानावर नकोच जंत्री यादी असुदे नाविक नावाडी माजी ती आजी नानी दादी असुदे जिनालयाचा कळस कांचनी संगमरवरी लादी असुदे

  • सुखद गारवा- “Pleasant coolness”

    तन भिजलेले वस्त्र सोवळे ऊन कोवळे सुखद गारवा सुकवाया मन ऊन कोवळे ..ऊन कोवळे सुखद गारवा चिंब भावना टपटपणाऱ्या शब्दांमधुनी झरझरणाऱ्या काव्यसंपदा जलद सावळे ऊन कोवळे सुखद गारवा जिनालयावर कळस तीन घन रत्नत्रय जणु अमूल्य हृदयी धूत वस्त्र नव फिकट जांभळे ऊन कोवळे सुखद गारवा नेत्रांवरती बांधुन पट्टी न्यायदेवता न्याय तोलते जिनशासन पण नसे आंधळे…

  • मिस यू – Miss You

    कमरेला मी तुझा पुढाऱ्या कसा बांधुनी आज मिरवते कंबर कसण्या गाळ उपसण्या करी लेखणी बाज मिरवते कर्म बांधले आजवरी जे मला न चिंता बिंता त्याची गळ्यात काळी पोत आणखी जळणाऱ्यांची लाज मिरवते पोतराज अंगणात नाचे मारित फटके स्वतः स्वतःला पोत्यांचे पोतेरे त्याचे डोईवरचा ताज मिरवते संगमरवरी ताजमहाली बसून बेगम गझला लिहिते दुधी असूदे अथवा काशी…

  • दुपार मौनी – Silent Noon

    झुकझुक गाडी मजेत धावे इंजिन घाली शीळ वळणावरती झुळझुळ वाऱ्या तुझी अंतरी शीळ सळसळणाऱ्या चाफ्यावर भुंग्यांचा भिंगत फेर कीड फुंकण्या पाकळ्यातली आली ओठी शीळ सुगंध ओल्या मृदेत भरण्या बकुळ फुलांचा सडा शिंपित जाई झुळूक शीतल घुमते कानी शीळ लाल गुलाबी धवल जांभळी सुमने फुलली छान रानपाखरू झुलत घालते फांदीवरती शीळ ऊन हिवाळी घाम काढते दुपार…

  • कलादालन – ART GALLERY

    कलादालन तैलचित्रे कुशल करांची विशुद्ध किमया कलादालन भाव भरल्या सजल करांची विशुद्ध किमया चित्रांमध्ये या चाले  मुक्त जरी रंगांची दंगल कला दालन न्याय देण्या विमल करांची विशुद्ध किमया ऊर्ध्व वेग घे जलद गती ओंजळ भरली हृदय मंदिरी कलादालन ग्राम नगरी कमल करांची विशुद्ध किमया ध्येयवेडी ब्रम्हभूमी चैतन्याने सळसळणारी कलादालन सरळ वर्षा अनल करांची विशुद्ध किमया…

  • ज्ञान – KNOWLEDGE

    सम्यक दर्शन अनुराग जिनांवर तन्मय होता मम राग जिनांवर स्तोत्र स्तुती रचते मी अक्षरांत ज्ञान शील तन धन राग जिनांवर

  • फिरकी – (to make fun)

    तरल कल्पना सांची भिरभिरणारी कवीची तसे भिरभिरे फुलपाखरु घेत गती कवीची फुल लपे पानाच्या मागे तसा शब्दाचा भुंगा कानामागुन घेतो फिरकी कवीची