Tag: Ghazal in maatraa vrutta

  • रोजरोजचे – ROJ ROJACHE

    कशास आता जाबसाल ते रोजरोजचे उतरुन ठेवू सांग मनाला बोझ रोजचे नसलेलेही दिसते आणि बिंब उमटते हृदयजलावर किती फुलांचे मोज रोजचे

  • जगत – JAGAT

    मी गुणगुणते जे गाणे आहे माझे माझ्यातुन उमले ते ते सारे माझे मी माझे माझे म्हणत राहिले जेव्हा पाहिले जगत मी अवती भवती तेव्हा

  • निर्मल – NIRMAL

    मी लिहीत आहे मुक्तक गझला गाणी झुळझुळते गाते त्यातील निळसर पाणी पाण्यावर डुलते एक कागदी नाव गाठण्या स्वप्नीचे निर्मल सुंदर गाव

  • सुई – SUEE

    सूत पकडुनी स्वर्ग गाठणे अवघड असते बिनछिद्राची सुई ओवणे अवघड असते जरी ओवला सुईत धागा अंधारातच अंधाराला शिवण घालणे अवघड असते प्रथमदर्शनी प्रेमामध्ये पडल्यावरती उठता बसता प्रेम पटवणे अवघड असते कोणालाही ना जोखावे मुखड्यावरुनी मुखडा पाहुन अंतर कळणे अवघड असते असे पटवले तसे पटवले गप्पा सोप्या हृदयामध्ये प्रीत टिकविणे अवघड असते पटवायाची बोलायाची बातच सोडू…

  • मुखडे – MUKHADE

    मुखड्यावरुनी मनुष्य कळणे सोपे नसते कळल्यावर पण ते समजवणे अवघड असते पूस माणसा ऐना अपुला बिंब पाहण्या ना पुसला तर अवघड सारे होवुन बसते विनाशकाले विपरित बुद्धी झाल्यावरती मोहाच्या जाळ्यात माणसा युक्ती फसते ना प्राण्यांना ना झाडांना मीपण बीपण फक्त माणसा अहंपणाची नागिण डसते मुखडे बिखडे विकार विसरुन हात जोडता शुद्धात्म्याचे रूप मनोहर हृदयी ठसते

  • वाघळे – VAAGHALE

    पहाट झाली जागी झाले ऊठ वाघळे मला म्हणाली अंधारातच पिंपळ सळसळ करतो आहे मला म्हणाली झिपरी पोरे मजेत गाती वेचत कचरा रस्त्यावरती गुणगुण गाता गाता गाणी असे गायचे मला म्हणाली बूच फुलांचा सडा मनोहर वेचायाला फुले जायचे स्वप्न किती दिवसांनी अजुनी पुरे व्हायचे मला म्हणाली फिरावयाला निघे पाखरू घरट्यामधुनी माय पाहते चिमण पाखरे किलबिल करती…

  • घडी – GHADEE

    झरझर धारा गर्जत याव्या तप्त दुपारी उतरुन याव्या डोळ्यांमधुनी सुस्त दुपारी भरता डोळे भरती पाने गर्द निळाई टपटप झरते तुझी आठवण फक्त दुपारी अवतीभवती किती धावपळ वर्दळलेली कशी लावु मी वर्दळीस या शिस्त दुपारी संघ्याकाळी उरेल काही लिहावयाला … वाटत नाही करेन सारे फस्त दुपारी असेच काहीबाही सुचते येते वादळ शोधत बसते जुनेपुराणे दस्त दुपारी…