-
शेजारी – SHEJAAREE
काया शेजारी आत्म्याची कायेवरती रुसू नको मोक्षासाठी शरीर साधन काम सोडुनी बसू नको नको विसंबू दुसऱ्यावरती स्वतः स्वतःला घडवित जा रत्नत्रय झळकण्या अंतरी मिथ्यात्वाने फसू नको जगण्यावरती प्रेम करावे जगास मिथ्या म्हणू नये म्हणशिल जर का जगास मिथ्या जगती पुन्हा दिसू नको ओळखून शक्तीस आपुल्या जप तप कर्मे करत रहा चूक स्वतःची जया न कळते…
-
जीवनभक्ती – JEEVAN BHAKTEE
कटू सत्य आम्ही प्राशियले तुम्हीही प्राशून पहा पचल्यावरती पचले आम्हा असे खरे बोलून पहा जीवनभक्ती कळण्यासाठी सत्य घोळवुन माधुर्यात मृदूपणाने कसे उतरते नकळत कंठातून पहा पुण्य जाळुनी उदाधुपासम सुगंध भरता तनीमनी तपवुन देहा उपवासाने संयम गुण जाणून पहा कुणी एक जगतास फिरवितो भ्रम डोक्यातुन त्यागुनिया अंतरातल्या प्रतिबिंबाला अकिंचन्य होऊन पहा खूप जाहले शोधुन भटकुन पाषाणी…
-
थट्टा – THATTAA
शौच म्हणा वा शुचिता मजला स्वच्छ राहूदे फक्त मला वक्रपणा जर ना सोडे मी शिक्षा व्हावी सक्त मला भरून प्याले ओतुन प्याले करण्यासाठी रिक्त मला अता व्हायचे भूमीसाठी कोसळणारा हस्त मला जरी भावते थट्टा तुजला धर्म शोध तू त्यात खरा मृदुता माझी माझ्यासंगे लागायाला शिस्त मला क्षमा माझिया लेखणीतली अविरत झरझर प्रेम झरे भिववित नाही…
-
डोस – DOS(DOSE)
मोक्षपथावर कधी न अडले घोडे माझे मम चरणांची वाट पाहती जोडे माझे खूप ऐकले उपदेशाचे डोस जनांचे ऐकत असते मीही आता थोडे माझे घात टाळण्या घाटामधल्या वळणावरती मोहक वळणे घेता अक्षर मोडे माझे मीच घातले होते मजला जे अनवट ते लयीत लोभस सहज उलगडे कोडे माझे गंडेदोरे का नडतील ग मला सुनेत्रा करी झळकता कनक…
-
दीप शर्वरी – DEEP SHARVAREE
श्रावण रमणी दीप शर्वरी दिवा लाविते श्रावण रमणी गोड गोजिरी दिवा लाविते पश्चिम सूर्याला वंदोनी हृदय मंदिरी श्रावण रमणी पीत पावरी दिवा लाविते अंधारे अंगण उजळाया तिन्हीसांजेस श्रावण रमणी वधू लाजरी दिवा लाविते हळदीकुंकू रेखुन भाळी तुळशीपाशी श्रावण रमणी प्रिया बावरी दिवा लाविते इंद्रधनूवर झोके घेउन दमल्यावरती श्रावण रमणी गझल नाचरी दिवा लाविते
-
माझी तरही – MAAZEE TARAHEE
तरही तरिही तरली तरली गझलियतीने चढली तरली माझी तरही लाख गुणाची जरी तरकली टिकली तरली उले आणखी मिसरे सानी गुंफुन तरही बनली तरली फुले पाखरे पर्णरुपातुन तरही कशिद्यावरली तरली तरहीमधुनी हसत सुनेत्रा झुल्यावरती झुलली तरली
-
वर्दी – VARDEE
अजून माझ्या निळ्या कपाटी वर्दी खाकी आहे करी कायदा घेण्याची मम इच्छा बाकी आहे वेग कशाला फुका वाढवू जाईन आरामात दो पायांची माझी गाडी चौदा चाकी आहे फिरविन लाठी वीजेसम मी कोसळण्या ढग हट्टी कातळ काळ्या दंडी माझ्या बिल्ला वाकी आहे अर्धा प्याला कसा भरू मी कधी न चिंता केली भरून प्याला देण्या जवळी प्रतिभा…