Tag: Ghazal in maatraa vrutta

  • मनमौजी – MAN-MAUJEE

    पुत्र असा मम दिव्य मणी कन्या सुंदर गुण रमणी झिम्मा फुगडी अन पिंगा खेळायाला चल सजणी उजाड माळावर बागा माझी सुंदर ही करणी गझल गझालां मनमौजी हरिणी म्हण वा तिज हरणी सुनेत्रात हे सुनेत्र दो जणू क्षमेची लाल फणी गझल मात्रावृत्त (१४ मात्रा)

  • तेलदिवे – TEL-DIVE

    जपण्यासाठी तेलदिवे मंदिर मातीचेच हवे जरी भाकऱ्या चौकोनी भाजायाला गोल तवे जडव कोंदणी मोती दो शुभ भावांचे उडव थवे अभयारण्यी वावरती गेंडे हत्ती रानगवे जुने जपोनी जाय पुढे सुनेत्रातले काव्य नवे गझल मात्रावृत्त (१४ मात्रा)

  • अलख निरंजन – ALAKH NIRANJAN

    मौक्तिकांस मी ओळखते खऱ्या हिऱ्याला पारखते कर्म निर्जरा करावया लावुन काडी जाळ खते पाण्यासंगे झाडाला करून आळे घाल खते खतांचाच तू व्यापारी भर पोते अन वीक खते चाळणीतल्या जलामधे मिसळुन सारी गाळ खते तर्हेतऱ्हेच्या कुदळीन्नी खणून खड्डा गाड खते अलख निरंजन म्हणताना स्वामी हसती गोरख ते गझल मात्रावृत्त (१४ मात्रा)

  • जिनमुद्रा – JINAMUDRAA

    उडवू पुष्पक सतीसकट तिचा व्हावया पती प्रकट वनी सारिका गाताना होईल ग तो यती प्रकट सुरुंग लावुन बघत रहा खळाळण्या गोमती प्रकट स्वर्ग धरेवर अवतरता मदनासंगे रती प्रकट बर्फ कुटीतील गाभारी जिनमुद्रा पार्वती प्रकट गझल मात्रावृत्त (१४ मात्रा)

  • धर्मगती – DHARM-GATEE

    खडका दे लाटेस मती येण्या जाळ्यात ती रती हिरवा पाचोळा उडता चंचल हरिणी बावरती काढ असे तू चित्र अता सरिता तो अन सागर ती संकटात ना डगमगते कणखर पण भावूक सती असो दैत्य वा देवरुपी मुक्त करे मज धर्मगती गझल मात्रावृत्त (मात्रा १४)

  • ओघळ – OGHAL

    अंडाकृति तव प्रिये चेहरा खरबुज वर्णी नीतळ सुंदर कृष्ण कुंतली तुझ्या विपुल घन नेत्रबाण दो सावळ सुंदर पहाट होता वेलींवरल्या पुष्प-पऱ्यांच्या नयनांमधुनी झरती रिमझिम धवल सुवासिक दवबिंदुंचे ओघळ सुंदर पौष पौर्णिमा नेसुन येता निळी पैठणी हरित धरेवर शिशिरामधल्या चांदणराती चिंब भिजावा कातळ सुंदर जुन्या जांभळ्या लुगड्यावरती जोडुन तुकडे चिटा-खणांचे पणजी माझी शिवायची नवी रंगबिरंगी वाकळ…

  • करतळ – KARATAL

    पाचोळा अन हिरवळ भूवर आठवणींचा दरवळ भूवर तव पदराची सळसळ भूवर कुणा वाटते मृगजळ भूवर किणकिणणारी कांच कंकणे जणू झऱ्याची खळखळ भूवर मृणाल कैसी फसेल चिखली उमटव उमटव करतळ भूवर नाच ‘सुनेत्रा’ जलदांमधुनी झरण्या मौक्तिक घळघळ भूवर गझल मात्रावृत्त – १६ मात्रा