-
चकल्या पाळे – CHAKALYA PAALEE
गझल लिहेन तुझ्यासाठी कमळ बनेन तुझ्यासाठी जलद रडेल खरेखोटे ख कोसळेन तुझ्यासाठी अशीच मस्त धुवांधार ग पडत जगेन तुझ्यासाठी कडवट कोळ मिठाईला विरघळवेन तुझ्यासाठी तिखट मधुर चकल्या पाळे कडक तळेन तुझ्यासाठी चल ललने फिरु बाजारी गुण उधळेन तुझ्यासाठी जरी सरळ तरल ‘सुनेत्रा’ कुरुप दिसेन तुझ्यासाठी गझल – १४ मात्रा लगावली – लगा/लगाल/लगागागा/
-
म्यागी मोदक – MYAGI MODAK
नकोच आहे? नीघ इथूनी नाटक काहे! नीघ इथूनी बघेल कोणी कशास चिंता!! कुणी न पाहे नीघ इथूनी ताटामधले म्यागी मोदक निमूट खा हे नीघ इथूनी तुझा छबीला प्रियकर बियकर इथे न राहे नीघ इथूनी वाऱ्यासंगे जायचेच तर वारा वाहे नीघ इथूनी पुरे बनविणे पुतळे बितळे अता न साहे नीघ इथूनी हा! हा! ही! ही! लिहिते…
-
सांजरम्य गझला – SANJ-RAMYA GAZALA
सांजरम्य गझला माझ्या पुन्हा पुन्हा वाच वाचण्यास मिटल्या नेत्रा उघड एकदाच पहा नीट बिंबा तुझिया लोचनात दोन सांडुदेत अश्रू होतो पापण्यांस जाच टाळशील भेटीगाठी किती काळ सांग खरेखुरे सांगायाला हवी काय लाच मधुर मधुर बोलायाला चांदण्यात न्हात अंबरात चंद्रालाही म्हणूयात नाच पावसास पाडायाला आतुरले मेघ गोष्ट नवी कोरी लिहिण्या ओंजळीत साच शब्द निळे लहरत येता…
-
आषाढ अधिक – ASHADH ADHIK
पाऊस उखळात कांडे धो धो आषाढ अधिकात नाचे धो धो फुसांडे वेगात गर्जत उसळत नदी पावसाळी वाहे धो धो प्रपाता ओतीत जलास घुसळत पाऊस धबाबा सांडे धो धो फेनील पाण्यात तुषार उधळित पाऊस रंगात रंगे धो धो विजेचा आसूड फिरवित ढगात पाऊस हुंदडे धावे धो धो मात्रावृत्त (१०+४+४=१८ मात्रा)
-
मोती शर – MOTEE SHAR
ज्येष्ठामधल्या सायंकाळी शुभ्र अचानक सर येते ढगामधुनी उन्हात फिरण्या पश्चिम क्षितिजावर येते सप्तरंगमय इंद्रधनुष्या निळ्या पटावर रेखाया सात स्वरांच्या छेडित तारा नाचत अंगणभर येते श्याम श्वेत कापूस घनातिल पिंजत उधळत सर वेडी गळ्यात घालुन गळा सरींच्या करात घेउन कर येते पिंपळ पानांची सळसळ अन उंबर तळीचा पाचोळा ऐकाया वेचाया वाकुन होऊन धरणी धर येते सखी…
-
पिकली कोडी – PIKALEE KODEE
कधी न घेते फोडुन डोके गुगली कोडी सोडविण्या त्यापेक्षा मी गझलच लिहिते असली कोडी सोडविण्या पटकन मजला हे कळतेकी जे ना अपुले धरू नये चुकून धरले तर ना डरते धरली कोडी सोडविण्या नक्कल करुनी कोडी रचता मिळणारे सुख ना शाश्वत आहे वेळ म्हणून का शिणू अडली कोडी सोडविण्या जन्मदिवस वर्षातुन अपुला फक्त एकदा खरा खरा…
-
गझलकारिणी -GAZAL-KAARINHEE
गझला लिहिते मी कवयित्री काय द्यायचे नाव मला गझलकार की गझलकारिणी प्रश्न सोडवुन पाव मला जरी तुला ना सुचते सुंदर मनाजोगते नाम अता सुजला सुफला जमिनीवरचे दे गझलांचे गाव मला मी तर साकी नाजुक कणखर चषक भराया उभी इथे प्राशुन त्यातिल पेय नशीले मोज दिलेले घाव मला सौदा केला ना काव्याचा ना माझ्या स्त्रीदेहाचा निश्चय…