-
कागद – KAAGAD
दशधर्माची शिडी चढोनी दहा पावले मोक्षासाठी उचल उचल माणसास प्राण्या उचल बाहुले मोक्षासाठी कथापुतळ्यांसम जीवन जगणे मम जीवाला ना मानवते चक्रव्युहासम क्लिष्ट सापळे कुणी बनविले मोक्षासाठी कुणी कुणाला पावत नसते फक्त पावती कर्मे अपुली देच पावती अथवा कागद जे जे जळले मोक्षासाठी तेलवात जळण्यासाठीही पात्र लागते हवा लागते मी देहाचे पात्र ताणले पण उजळवले मोक्षासाठी…
-
गणेशरूप – GANESH ROOP
कुमारिकांच्या हृदयामध्ये वसले गणेशरूप मोदक हाती घेउन बसले हसले गणेशरूप तीर्थंकर वाणी खिरताना विशद कराया तिला ऋद्धी सिद्धीसंगे गणधर बसले गणेशरूप सम्यग्दर्शन चारित्र्याने ज्ञान झळकता खरे धर्मामधल्या मिथ्यात्त्वाला डसले गणेशरूप अर्ध्या अधुऱ्या मिटुन पापण्या अंतर्यामी बघे बुद्धीची देवता बनूनी ठसले गणेशरूप शिकवुन संयम मनुष्यप्राण्या केले त्याने मूक मज आकळले मला भावले असले गणेशरूप गझल मात्रावृत्त…
-
जिनदेव – JIN DEV
जिनदेवांची वाट पाहते आत्मधर्मी राधा जिनदेवांची गोष्ट सांगते आत्मधर्मी राधा सत्य जाणण्या जन्मजन्मिचे दर्पण तोडुनीया जिनदेवांची भेट मागते आत्मधर्मी राधा काष्ठाच्या मंचकावरी घन पूजन करावयास जिनदेवांची मूर्त मांडते आत्मधर्मी राधा भल्या पहाटे शुद्ध घृताच्या दिव्यात तेजोमयी जिनदेवांची भक्त भासते आत्मधर्मी राधा जिनदेवाच्या भक्तीमध्ये चिंब चिंब न्हाउनी जिनदेवांची प्रीत वाचते आत्मधर्मी राधा गझल मात्रावृत्त (मात्रा २७)
-
याड – YAAD
-
पानगळ – PAANGAL
मनात माझ्या दडले होते स्वप्न मला ते पडले होते जरी संकटे धावुन आली मनासारखे घडले होते स्वतः स्वतःवर केली प्रीती प्रेम स्वतःवर जडले होते पहात होते मी खिडकीतुन उंबऱ्यात ते अडले होते पानगळीचा ऋतू सुखाचा पान पान मम झडले होते जिवंत होती मैनाराणी पंख तिचे फडफडले होते सांग प्रियतमा सुंदर सुंदर रूप कुणाला नडले होते…
-
फुकनी – FUKANEE
चिमटा झारा फुकनी असुदे माय मोडुनी कलम बनविते कोंड्याचा ती मांडा करुनी घास पिलांच्या मुखी भरविते कधी चाक तर कधी अश्वही कधी सारथी माय होतसे चाबुक हाती घेत विजेचा संसाराच्या रथा पळविते आय बाय वा अम्मी मम्मी अनेक रूपे माय वावरे आईची ती आऊ होउन ताक घुसळते तूप कढविते बोट धरोनी शाळेमध्ये वेळेवर बाळांना नेते…
-
अत्तर – ATTAR
फुलात असतो सुगंध जो तो कुपीत भरता होते अत्तर प्रियतम माझा माझ्या संगे प्रीत तयावर माझी कट्टर फुले बाल अन तरुण साजिरी सुकल्यावरती अपसुक गळती त्यांना नसते वृद्धावस्था साठी आणिक वय बिय सत्तर सप्तरंग धाग्यात भरोनी एक सुबकशी विणून पिशवी वह्या पुस्तके मोरपिसे मी तयात भरता होते दप्तर पाषाणाला ठोक ठोकुनी शिल्पी छिन्नीने घडवीता देव…