-
उनाड – UNAAD (vegabond)
-
यंत्रयुग – YANTR YUG (the machine age)
-
बाकी – BAAKEE (remaining)
काय राहिले सांग प्रियतमा लिहावयाचे बाकी किती राहिले पत्थर अजुनी भिजावयाचे बाकी दगडावरती साठत गेली बांधावरची माती बोल केवढे अंकुर आता रुजावयाचे बाकी कैक भरवल्या खतावण्या तू लिहून भाकड गोष्टी पात्र कोणते कथांतल्या त्या रडावयाचे बाकी चंचलपण तव नकोस मिरवू उघड चंचले चंचू उकरुन माती टाक पुरून जे पुरावयाचे बाकी पोपटपंची नको नाटकी पूस ‘सुनेत्रा’…
-
बोर जाहले बोर – BOR JAAHALE BOR (I am very bored)
-
अव्वल – AVVAL (topper)
नव्या युगाचे सुंदर माझे गाणे ऐकत आहे अंबर माझे गाणे लेखणीतुनी झरती जैसे मोती हृदयामधले घुंगर माझे गाणे रक्तपात अन टाळत अकाल मृत्यू जिंकिल आता संगर माझे गाणे फुलण्यासाठी हिरवी सृष्टी बनते निळ्या नभातिल झुंबर माझे गाणे सदा ‘सुनेत्रा’ साऱ्यांमध्ये अव्वल पहिला पहिला नंबर माझे गाणे मात्रावृत्त – (८+८+४=२० मात्रा)
-
हरिण-कस्तुरी – HARIN-KASTUREE(musk deer)
दवबिंदुंचे उदक साठवुन सहाण भरली हसली काष्ठ चंदनी फिरता वरती फूल सुवासिक बनली बनी केतकी नागिण फिरते सळसळणारी चपला कैद कराया तिज बुंध्याला बिजलीने कंबर कसली पुष्पपरी मी उडेन आता म्हणत म्हणत ती पडली मृद्गंधित घन मातीमध्ये लोळुन लोळुन दमली चपळचंचला संयमधर्मे उडून जाता स्वर्गी नागफण्यासम श्यामल सुंदर वीज नभी लखलखली वनहरिणी ती ऐकत गाणे…
-
टमाटे – TAMAATE (tomatoes)
आज टमाटे संपव तू चित्र नव्याने रंगव तू वहीवरी जे लिहिशी ते अक्षर अक्षर टंकव तू द्वेषाचे अन भोगाचे शिल्प बुभुक्षित भंगव तू वासनेत ती बुडे जरी प्रेमाने तिज गंडव तू तापवणाऱ्या डोक्यांना सतत बोलुनी भंडव तू घाण साठता कोंड्याची पूर्ण कुंतले मुंडव तू सम्यकदर्शन होण्याला आत्मियात तिज गुंगव तू नकोस टाळ्या टाळ पिटू गझली…