Tag: Ghazal in maatraa vrutta

  • बावखोल – BAVKHOL

    बावधनी आड कैक दोषग्या बावखोल अर्थ ऐक दोषग्या खोल उतर आत शोध दोष तव बावडीत जन्म नैक दोषग्या नको अम्हा हाकु बिकू जा घरा बावळटां म्हणत हैक दोषग्या तुंग गिरी आकाशी पारवा बाव चीत भाव क्षैक दोषग्या वृक्षतळी बोरमणी कवडसे बावचळे स्वार बैक दोषग्या

  • शंख – SHANKH

    उठव स्वतःच्या सौन्दर्यावर ठसा स्वतःचा उधळ स्वतःच्या सुंदरतेवर पसा स्वतःचा कशास तुजला कुणी म्हणावे स्वतःस ओळख स्वतःस कळता पूर्ण कहाणी वसा स्वतःचा कोमल काया तरल मनाची अवघी माया कटीवर सांडे कनक गुणांचा कसा स्वतःचा ऐन्यामध्ये रंगरूप बघण्याच्या आधी नित्य करावा साफसूफ आरसा स्वतःचा कंठ गळा जणु शंख सुनेत्रा फूंक तयाला श्वासातून मोकळा कराया घसा स्वतःचा

  • चुळबूळ – CHULBOOL

    अमूल मूळ कुठले कूळ नवीन नाव भंजन खूळ खा पोळीस मोडुन सूळ बसले शांत चारुन धूळ जल पान करु भरून चूळ वय जाहले का चुळबूळ मी सुनेत्रा मोडे शूळ  

  • सुकण्ण – SUKANN

    कंठ शंख आवाज पुणेरी नखऱ्याचा नव बाज पुणेरी झणक फणक मिरचीचा ठसका ऐक समुद्री गाज पुणेरी ढोल नगारे लखलाभ तुला वाजविते पखवाज पुणेरी गालांवर रक्तिमा स्वरांकित नयनांनमधली लाज पुणेरी सुकण्ण सळसळते दो बाहू सुनेत्रास सरताज पुणेरी

  • पत्री – PATREE

    अक्षर मोती शिम्पल्यातले अक्षर पत्री टपटप झरले जीवांमधले भाव रुजाया पत्रावरती जलद बरसले कितीक पत्रे किती छप्परे दारे भिंती फळे जाहले वनी अंगणी कैक काफिये रदीफ इंजिन त्यास जोडले अलामतीला जपेन म्हणता चिद्घन चपलेचे कर जुळले  

  • बकरी – BAKRI

    बकरी म्हण वा तिला भाकरी पसंत खाण्या मला भाकरी बाकुर सारण काहीही भर उचल करंजी कला भाकरी लळा लागल्यावरती बकरी खाऊ म्हणते चला भाकरी देय बाहुली थापुन भाकर भाजतोय बाहुला भाकरी तांदुळ ज्वारी रागीचीही करून देते तुला भाकरी क्षुधा शमविते लोरी गाते दोन तागडी झुला भाकरी उदरभरण अबलांचे करण्या देह तपविते बला भाकरी

  • चिकित्सा – CHIKITSA

    राजा अपुला वजीर व्हावा नको बोलका पोपट रे पंत उपाधी खरी खरी पण उपमा अस्सल खोपट रे राणी अपुली राणी असुदे राजासंगे तृप्त सुखी नको क्वीन चा वजीर हाजिर गा अंगाई थोपट रे शुद्धमतीने गझल लिहावी साच्यामधली मूर्त नको प्राकृत भाषा जिन वाणीची उधळे मिथ्या जो पट रे ऋषी मुनींच्या ऋद्धी सिद्धी देव दिगंबर ग…