Tag: Ghazal with Saarvan

  • स्वतः – SWATHA(MYSELF)

    स्वतः स्वतःवर करते प्रेम स्वतः मुलांवर करते प्रेम हृदय फुलांचा दरवळ घेत स्वतः जगावर करते प्रेम तनामनासह बुद्धी साक्ष स्वतः जिवांवर करते प्रेम जरी कुणाला वाटे धाक स्वतः गुणांवर करते प्रेम बुडवुन लज्जेस सुनेत्रात स्वतः जिनावर करते प्रेम

  • कारण – KARAN(REASON)

    कारण साधारण जगण्याचे कारण पण कारण जगण्याचे ठोकायाला असो कुणीही कारण ते आरण जगण्याचे हवेच कारण सदैव हृदयी कारण ना तारण जगण्याचे ग्रह ताऱ्यांचे खगोल शिकण्या कारण कर धारण जगण्याचे भाव अधिक ज्येष्ठाच्या नंतर कारण मधु श्रावण जगण्याचे आषाढाच्या नाजुक लेकी का रण पाचारण जगण्याचे ..? जाण सुनेत्रा शरण्य आत्मा कारण हे सारण जगण्याचे

  • सोपान – SOPAN(BRIDGE)

    जिनालयाची वाटिका झाडे तरू वृक्ष वेली जिना चंदनी सोपान जाई जुई दक्ष वेली कुंभ कलश घडा हंडा भरूनी सांडते घागर जिनायतना तोलाया खांब साही तक्ष वेली रत्नत्रय चूल अग्नी चंदनाच्या बनी वारा जिनवाणी माय आई मोगऱ्याच्या अक्ष वेली यक्ष यक्षिणी देवता क्षेत्रपाल रक्षायाला जिनशासनाची सत्ता सिद्धचक्री वक्ष वेली जल गंध तांदूळ पुफ्फ दिव्व धुव्व चरू…

  • चमत्कार – CHAMTKAAR(MIRACLE)

    डबघाईचे दुकान माझे तरून आले डबडबुनी दो अतिशय डोळे भरून आले चमत्कार बघ कैसा झाला पंचम काली डबडे बडवत अजाण बालक वरून आले विपर्यास का कुणी करावा अर्थ लागण्या डब घालाया घासुन भांडी घरून आले एक पाहुणा जेव्हा आला मुक्कामाला डबल बेडचे सिंगल झटपट करून आले इंग्लीश हिंदी आणि कन्नड बोल “सुनेत्रा ” डबरा भरण्या…

  • बिजली – BIJALEE (LIGHTNING)

    थंडावली घनात बिजली कडाडणारी थंडावली रणात बिजली कडाडणारी रंगून रंगवीत भिजली स्वरात राई थंडावली वनात बिजली कडाडणारी गागालगा लगाल गागालगा लगागा मात्रांसवे गणात बिजली कडाडणारी मेघांत गोठवून जलधार अंतरीची नाचे तनामनात बिजली कडाडणारी कातावल्या शरास धरता करी सुनेत्रा अंगी कणाकणात बिजली कडाडणारी

  • खाक्या – KHAKYAA(METHOD OF DOING WORK)

    मौन काव्या कळे सख्य माझे तुझे मौन अधरी भले सख्य माझे तुझे नित्य सौख्यात मी रोज तैसाच तू मौन उघडे दळे सख्य माझे तुझे दावता पोलिसी कडक खाक्या तुझा मौन किंचित हले सख्य माझे तुझे मस्त माझ्यात मी मूक होते सखे मौन सखये तळे सख्य माझे तुझे शोध कोठे सखी गुप्त झाल्या सख्या मौन मुक्ताफळे…

  • कारण – KAARAN(REASON)

    कारण चपखल रुतते आहे कारण त्याचे सलते आहे शब्द चोरटे गाली हसता कारण नकळत फिरते आहे चोरांच्या उलट्या बोंबांनी कारण तिळतिळ तुटते आहे पुफ्फ सुगंधी दरवळणारे कारण सौरभ झरते आहे मधमाशीसम बछड्यांसाठी कारण कारण लढते आहे घुम्या वेदना घुमत राहती कारण पुरुनी उरते आहे भरून पिंडी आनंदाश्रू कारण जखमा भरते आहे क्षण क्षण बाकी जगे…