पाचारण – PACHARAN


कारण साधारण जगण्याचे
कारण पण कारण जगण्याचे

ठोकायाला असो कुणीही
कारण ते आरण जगण्याचे

हवेच कारण सदैव हृदयी
कारण ना तारण जगण्याचे

ग्रह ताऱ्यांचे खगोल शिकण्या
कारण कर धारण जगण्याचे

भाव अधिक ज्येष्ठाच्या नंतर
कारण मधु श्रावण जगण्याचे

आषाढाच्या नाजुक लेकी
का रण पाचारण जगण्याचे ..?

जाण सुनेत्रा शरण्य आत्मा
कारण हे सारण जगण्याचे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.