-
भाकीत – BHAKIT (PRESAGE)
हातावरील रेषा रेखून राम गेला वेळेत वेळ अपुली पाळून काळ गेला जगणे सवंग होता करतात खेळ कर्मे परधर्म बघ भयावह सांगून कृष्ण गेला पंचांग तू स्वतःचे लिहिण्यास शीक मनुजा रद्दी विकून नोटा लाटून टोळ गेला लोण्यासमान जमिनी झरत्या झळा उन्हाच्या बहरात ग्रीष्म आला कढवून तूप गेला मम शब्द ढगफुटीसम तू झेलता सुनेत्रा भाकीत भेकडांचे उडवून…
-
विशुद्धी – VISHUDDHI(PURITY)
संकल्पाची जात असावी ठाम निश्चयी संकल्पाला वात असावी राम निश्चयी पुढच्या वर्षी करूच पुढचे आज आजचे संकल्पासह बात असावी दाम निश्चयी व्यवहाराने जगती जगता जीव जपाया संकल्पातच मात असावी साम निश्चयी भरून प्याला जसा सांडतो पुण्य तसे हे संकल्पा तुज कात असावी घाम निश्चयी कर्मनिर्जरा सहज सुनेत्रा अशी विशुद्धी संकल्पावर पात असावी नाम निश्चयी
-
प्रहार – PRAHAR(THUMP)
-
रजक – RAJAK (LAUNDRESS)
शेतकऱ्याला कष्टकऱ्याला पिळवुन घेशी, घडा भराया कर्मांचा शंभर वर्षे सरली भरली बघणाऱ्यांची, धडा लिहाया कर्मांचा परीट धोबी रजक अगस्ती नावे मिरवित, बडव बडवती रोज धुणे पिळुन सुकवती दोरीवरती ऊन हवेने, चुडा फुटाया कर्मांचा नागिण फिरते विहिरीवरती ये बाहेरी, वारुळ फोडुन सळसळुनी नागोबा होऊन डोल रे फणा उभारुन, खडा पडाया कर्मांचा चपळ लेखणी ज्वलंत प्रश्नांवरती लिहिते,…
-
अंगठा – ANGTHAA (THUMB)
-
मध्यरात्री – MADHYARAATREE ( AT MIDNIGHT)
-
फळकुटे – FALHAKUTE (WOODEN PLANKS)
शहरगावी सून आली राहण्या एक खोली मून झाली राहण्या घासलेटी स्टोव्ह होता रांधण्या सोबतीला जून पाली राहण्या घासुनी फरशीस देण्या चारुता गुणगुणे ती धून चाली राहण्या ओसरी नव्हतीच नव्हते स्नानघर फळकुटे जोडून न्हाली राहण्या शेत नाही तिज स्वतःचे राबण्या राबतेय विणून शाली राहण्या पाठ छहढालास करुनी आज तू आणल्या जिंकून ढाली राहण्या लागला लग्गा कुणा सट्ट्यावरी…