Tag: Maatraa-baddha kaavya

  • मुग्ध गारवा – MUGDH GAARAVAA

    पौषामधली पहाट माझ्या मनात नीतळ  गाणे गाते मम आईच्या मृदुल मनाची झुळूक शीतल गाणे गाते मुग्ध गारवा सुखद शहारा अंगागाला स्पर्शून जाता मौनी पदपथ अविचल तारे निश्चल सळसळ गाणे गाते असशिल कोठे ठाऊक नाही तरी कल्पना मनी खेळते निवांत वेळी शांत एकटा गाठुन तरुतळ गाणे गाते

  • गारवा – GAARAVAA

    केळी द्राक्षे दहिभाताचा धाड गारवा तोलायाला वजने मापे एक ताजवा बसून जेवण करण्यासाठी अंथर चटई असेल जेथे थंड जलाचा स्वच्छ कालवा मिरचीठेचा उसळ मुगाची झुणका भाकर चवीचवीने खाइल चिमणी द्वाड पारवा गाजर-हलवा चिक्की बर्फी पानसुपारी देउन तिळगुळ नात्यांमधला जपू गोडवा किलबिल करतिल मुले पाखरे झाडांभवती फुलेल मोहक कळ्याफुलांचा शुभ्र ताटवा

  • गझलानंद – GAZALAANAND

    त्रिशंकुची चार टोके, असतिल ज्याच्या पृष्ठावरती, अशा गोलकाच्या मी केंद्री, झुकविन माथा अनंत वेळा! अविनाशी आत्मियाशी, भांडुन तंटुन थकल्यावरती, शांत मनाने बसेन तुझिया, चरणी नाथा अनंत वेळा! ढोल तबला सुरपेटी, हीच साधने ग्रामजनांच्या, देइन हाती मैत्री करण्या, सूर ताल अन लय शब्दांशी; नृत्य संगीत शिकाया, बडवित टिपरी टिपरीवरती, ऐकत राहिन आत आतला, तै तै था…