Tag: MARA POERTY

  • नवनगर – NEW CITY

    चित्र रेखिले चित्र बनविले बुद्धीपूर्वक भाव मनीचे सहज सहज मम त्यात प्रकटले .. मुनि हृदयीचे उदक शिंपडुन वेलीवरती मात्रा मोजत खुडता पाने हात प्रकटले….. श्रीगोंदा नवनगर जाहले यतिभंगाने यती कोपता आठवणींची अर्पुन ओंजळ .. जिनवाणीचा सार प्राशुनी रक्षायाला वृक्ष वाटिका मगरीचे दो दात प्रकटले …..

  • कारंजे – FOUNTAIN

    नयन मनोहर कारंजे तुषार सिंचन उदक पडे किती खोदशिल खोल दरी किती दिवस हा खेळ गडे चंदन मात्रा उगाळुनी बाराखडी ग गझलेची जिनेश्वरावर स्तवन स्फुरे छत्र धराया नाग फडे जमीन आणिक शेर गुणी सहज जुळावे पंचांगी रत्नत्रय हृदयात वसो जाणण्यास व्यापार धडे निसर्ग गाथा गात रहा जिनायतन मन साथीला अभिषेकास्तव प्रतिमेच्या भाव जलाचे पूर्ण घडे…

  • जिन बागवान – GOD

    मुक्तक – जिन मन लालची न मम लाल जिन सिद्ध मूर्त तन लाल पथ मुक्ति धाम गुण माल धन पीत धवल वन लाल मुक्तक – बागवान मनोरमा बाई रान डेझी डेलियाचे मनोरम्य ताई रंग डेझी डेलियाचे बागवान शुद्ध आत्मा माझा धर्म स्वभाव मोगऱ्यात आई गंध डेझी डेलियाचे

  • आई – AAEE (mother)

    आई म्हणजे पैंजण छुण छुण आई नाजुक कंकण किणकिण आई नसता घरात भणभण आई असता नसते चणचण छळे गारठा जेव्हा जेव्हा आई बनते मऊ पांघरुण शिणल्यावरती कुशीत घेण्या आई बनते कधी अंथरुण नीज यावया मला सुखाची आई गाते मंजुळ रुणझुण फुलाफुलातुन सुगंध उधळित आई व्यापे अवघे कणकण सुखी कराया तिची लेकरे आई करिते अखंड वणवण…

  • ऊन काहिली – UOON KAHILEE (agony caused by heat))

    ऊन काहिली थंड कराया पाऊस गाणी झरती चला जाऊया सैर कराया डोंगर माथ्यावरती कुदळ फावडे घेऊन हाती हात आमुचे खणती तण उपटूया खड्डे करूया खांब रोवण्यासाठी भूमी मापन अचुक करूया घेऊन हाती काठी घाम गाळूया माती भरुया धावू वाऱ्यापाठी मडके भरुया सडा शिंपुया  जमीन करण्या ओली लांबी रुंदी उंचीसंगे भरून टाकू खोली कुंपण गर्द कराया…

  • घड्याळ माझे – GHADYAAL MAZE (my wall clock)

    लंबक हलतो काटे फिरती करते टिकटिक घड्याळ माझे सुसम तबकडी आकडे बारा चाले झुकझुक घड्याळ माझे जोवर घेते श्वास तोवरी अखंड फिरती हात तीनही सेल संपता श्वास अडकतो करते चुकचुक घड्याळ माझे धूळ झटकण्या अंतरातली भिंतीवरुनी उतरे खाली वळवुन काटे सेल घालता गाते धकधक घड्याळ माझे जुनी ब्याटरी  बुरसटल्यावर कधी कधी चाले किल्लीवर मूढ अडमुठ्या…

  • माग – MAAG (to trace)

    स्वप्न पाहिले होते तेंव्हा फक्त तुझेकी त्यांचेही या प्रश्नांचा माग काढण्या अजूनही बघ गाते मी भेटी अपुल्या त्या तेंव्हाच्या दर्पणातल्या प्रीतीच्या क्षण अनुभवण्या हुरहुरणारे मागे मागे जाते मी शांत तडागाच्या काठावर बसुन पाहता प्रतिबिम्बा बिंबामधली अनंत रूपे तुझीच बघुनी खुलते मी जे जे माझे ते सर्वांचे वेगवेगळे ना काही सुटता गुंता उजळुन जाते तुझे नि…