-
घडणावळ – GHADANAAVAL
आठवण येता लयीत येते गझल गडे शब्द सुरांचे नाते जडते तरल गडे वळती गझला झुलती गझला ऊर्ध्वगतीने सांग कशाने वळणे झाली सरल गडे झुळूक येता सुगंध भरली बांधावरुनी मम हृदयीचे मेघ जाहले सजल गडे शब्द सुरांचे कळप जाहले उन्हात बसले तापतापुनी शुभ्र जाहले अमल गडे नवलाईचे दिवस नऊ ग घडणावळीचे घडविण म्हणता खरेच घडले नवल…
-
विशुद्धमती – VISHUDDH MATEE
कोमल कुसुमांवरी रंगल्या उडते फुलपाखरू भृंगासम गुणगुणते गाणे चंचल मनपाखरू मधमाश्या मधुसंचय करिती बांधुन पोळे छान लोट सुवासिक वाऱ्यावरती धुंद केतकी रान आंबेराईवरून येते लहर सुगंध भरली काटेरी कुंपणावरीही रातराणी फुलली नीर व्हावया शीतल सुरभित वाळा माठातळी बंद पाकळ्यांमध्ये जपते परिमल चाफेकळी ग्रीष्माची चाहूल झळाळी मोद उधळते मनी कवीमनाच्या पऱ्या बसंती झुलताती अंगणी असा उन्हाळा…
-
गोमंतक – GOMANTAK
गोमंतक भू वरचा सुंदर स्वर्ग जणू आहे गोमंतक सृष्टीदेवीचा वर्ण जणू आहे काव्य झराया सदैव अनुकूल निसर्ग गोव्याचा गोमंतक काव्याचा आशय गर्भ जणू आहे अक्षरपंखी पुष्पपऱ्यांच्या सुगंध यात्रेची गोमंतक निर्मिती जादुई अर्थ जणू आहे अतिथी देवासमान मानुन तृप्त त्यांस करणे गोमंतक देशाचा हा तर धर्म जणू आहे सोनेरी भूमीत दिव्य या वनमंदिर शोभें गोमंतक आगम…