आठवण येता लयीत येते गझल गडे
शब्द सुरांचे नाते जडते तरल गडे
वळती गझला झुलती गझला ऊर्ध्वगतीने
सांग कशाने वळणे झाली सरल गडे
झुळूक येता सुगंध भरली बांधावरुनी
मम हृदयीचे मेघ जाहले सजल गडे
शब्द सुरांचे कळप जाहले उन्हात बसले
तापतापुनी शुभ्र जाहले अमल गडे
नवलाईचे दिवस नऊ ग घडावयाचे
घडविण म्हणता खरेच घडले नवल गडे