Tag: Marathi Baal-geet

  • खार – KHAAR

    खार उचलते वाटा अपुला स्वतः स्वतः… मजेत खाते खाऊ मिळता स्वतः स्वतः …. खाऊ खाते खारुताई किती आवडीने… शेपूट घेते पाठीवरती किती किती डौलाने… खातानाही रुबाब कितीहा खारुताई तुझा… बिंब दावती तुझ्या मनाचे नयन निरागस जणू आरसे..

  • पेढे – PEDHE

    निळे जांभळे थेम्ब बोचरे तुझे टपोरे आले काळ्या कोऱ्या पाटीवरती अक्षरांत मी न्हाले गडद काळिमा शांत होऊदे प्राशुन हिरवे पाणी मुळाफुलांनी गावी आता निळसर पहाटगाणी घूम पावशा पानांआडून येण्या पाऊसधारा उन्हास हळदी तना लपेटून शीळ घालण्या वारा लिहीन गाणी सहज सहज मी नाव सुनेत्रा माझे कळ्याफुलांचे गेंद तरुंवर दलात सौरभ ताजे सुगंध लुटण्या येतील भुंगे…

  • क्रोकरी – KROKAREE ( CROCKERY )

    एक ओळ मज सुचते जेंव्हा लिहावयाला काही भातुकलीतिल पितळी भांडी का घासू मी बाई टाळेबंदीच्या डावातिल डाव पळ्या अन काटे घासायाला भांडेवाली नकोच म्हणते वाटे मीठ चिंच वा लिंबू फोडी नको घालवू वाया पितांबरीने लख्ख उजळते तांबे पितळी काया किणकिणणारी सान क्रोकरी चहा म्हणूनी पाणी तरंग उठता हलके हलके अधरी बडबडगाणी

  • कुजबुज – KUJ BUJ

    गडगड गडगड मेघ गर्जती झुळझुळ झुळझुळ लहरी फिरती कडकड कडकड विजा तडकती झरझर झरझर धारा झरती सळसळ सळसळ पाने डुलती टपटप टपटप थेंब सांडती घरघर घरघर वारे दळती सरसर सरसर जलकण पडती खळखळ खळखळ झरे वाहती किलबिल किलबिल खग किलबिलती कुजबुज कुजबुज कलिका करती लदबद लदबद फळे लगडती चटचट चटचट मुले प्रकटती पटपट पटपट खात…

  • मनी माऊ – MANEE MAAOO

    मनी माऊ सांगा कुठे चालली हाय? मळ्यातल्या आडावर चालली हाय। का बरे आडावर चालली हाय? शेंदाया पाणी चालली हाय। बादली नि घागर कुठं हाय ? पाठीवर पखाल बांधली हाय। कुणाची वाट बघतेय माऊ? चिऊची वाट बघतेय माऊ। चिऊला उशीर का झाला? चिऊच्या बाळाला ताप आला। माऊला मेसेज केलाय काय? चिऊचं वॉटसाप बंद हाय। माऊला आडावर…

  • सैपाक – SAIPAAK

    पहाट झाली बाई आता- सैपाकाची घाई विसळ भांडी विसळ गुंडीत ताक घुसळ मळ कणिक मळ दाब नळाची कळ पालेभाजी ताजी धुवून चिर भाजी फोडणी घाल झकास खमंग तिखट खास पोळ्या लाट पोळ्या मऊ मऊ पातळ भाज हलके हलके करू नको वातड गोल गोल डबा त्याला स्वच्छ धुवा कोरडा छान करा त्यात जेवण भरा

  • पवनचक्की – PAVAN CHAKKEE

    आला आला वारा रे पाऊस आणिक गारा रे चल चल जाऊ खेळाया अंगणी गारा वेचाया पागोळ्या झरझरती ग झरे नद्या खळखळती ग भरून ओढा वाहे ग ऊन त्यावरी सांडे ग सोनेरी पाणी झाले बिंब केशरी वर डोले शिंदीची झाडे डुलती बकऱ्या सान तिथे चरती हिरवळ धरणीवर हिरवी पवनचक्की मारुत फिरवी सूर्य निघाला झोपाया पुन्हा पहाटे…