-
प्रतिमा – PRATIMA (IMAGE)
शुद्ध चांदीच्या निरांजनी या शुद्ध तुपासह वात तेवते; कारण आजी कापूस पिंजुन वळून वाती जपुन ठेवते. गाळुन जल हे आजोबांना नात गोमटी आणून देते, अभिषेकाने प्रभूची प्रतिमा कषाय मनीचे अपुल्या नेते. गुलाब, चंपक, जुई, मोगरा परडीमध्ये फुले जमवितो, खट्याळ नातू सर्वांआधी आईसाठी फुले निवडतो. आजी गाते भजन आरती बाळांसाठी अन अंगाई, बाबा रचती कवने गीते…
-
काय काय भाऊ? – WHAT IS GOING ON BROTHER
This poem is written for children. This song is known as bal-kavya. अंगणात दंगा करतंय कोण? कोण कुणाला करतंय फोन? ही तर आपली गुबरी माऊ, ससोबाला म्हणतेय काय, काय भाऊ? येना अंगणात करायला दंगा, वाऱ्यासंगे घालायला पिंगा! ससोबा येताच चिमण्या आल्या मैना आली पोपट आणि बदक आले अंगणात चालला पाखरांचा दंगा .. किलबिल कलकल चिवचिव…
-
प्रिय आमुचा देश – OUR DEAR COUNTRY
India is our country. This poem is a patriotic poem. Though there variety in languages, costumes we love our country. Unity in variety is our power. विविध प्रांत अन विविध बोली, रंग, रूप जरी वेश; भारत अमुचा देश! प्रिय आमुचा देश!! गोड गोजिऱ्या मुली आमुच्या, शिकत राहतिल कला नी विद्या, तृण-बाळांना सुद्धा जपतिल, कधी न…
-
खेळ – GAME
In the summer holidays children play different games like Chendufali (criket), hide and seek etc. After playing in the hot sun children buy Kulfi from Kulfivala. In Marathi the word ‘Garegar’ is used for Kulfi. कोण खेळते चेंडू-फळी अन कोण खेळते पळापळी….. कुणी लंगडी घालत येते- हळूच गुपचूप पाय बदलते; पाठीवरती ‘खो’ घालुनी, बसलेल्याला कुणी…
-
बाळाचं बोरन्हाण – BABIES BERRY BATH
बाळ आमचं शोनुलं कुरळ्या केसाचं तान्हुलं बाळाचे डोळे हसणारे कान अंगाई ऐकणारे बाळाचं नाक चाफेकळी हनुवटीवर खोल खळी गुलाबाची पाकळी बाळाचा रंगीत पाळणा जणु आजीचा झोळणा झबलं बाळाचं झालरीचं कुंचीवर चित्र मोराचं बाळाचं बोरन्हाण आहे आज पाहुण्या जमल्यात खास खास बाळाला म्हणतात हास हास दरवाजाला लावल्यात झावळ्या बोरांनी भरल्यात रोवळ्या आत्या आज्जी मावशी मामी यांनी…
-
मज्जा करूया! – WILL MAKE FUN
उन्हाळ्याची सुट्टी आली; मज्जा करूया! सोसायटीच्या पार्किंगमध्ये, चेंडू खेळूया! प्लास्टिकचा हा चेंडू बघा टप्पे घेत नाही, लोखंडाचा चेंडू तर- उडतच नाही. आपला रबरी चेंडू पळे किती- थांबतच नाही. पकडुन आपल्या चेंडूला टप्पाटप्पी खेळू; जास्त टप्पे कोणाचे ते- भराभरा मोजू. कोण जिंकलं? कोण हरलं? वादावादी नको; सुट्टी संपेल भांडा-भांडीत- वाद आता नको. आज जिंकू,उद्या हरू, परवा…