-
शाश्वत – SHASVAT
आरोग्य लाभले मज आहे किती निरामय आभार मम भुताचे मम वर्तमान तेजस काहीच ना उणीव कुठलीच खंत खेद घेईन दो करांनी देतेय पूर्व कर्म जगण्यात भावपूर्ण आरोग्य साथ देते आत्म्यातल्या जिनाचे गुणगान नित्य गाते रत्नत्रयास जपणे मम हाच धर्म शाश्वत लिहिती जिनानुयायी समृद्ध भोवताल गाणे असेच गावे हृदयातुनी झरावे लाचार भ्रमित मिथ्य गेले पळून गेले
-
सांची नग्नता- SANCHI NAGNATA
नग्नता … .. जगवते कैवल्य खिरते चांदणे चंद्राप्रमाणे काफिया मम मातृधर्मी नग्नता बापाप्रमाणे मुक्तकांची स्वर्णमाला ओविली आहे फुलांनी वेळ मजला हात देते सावळ्या काळाप्रमाणे सांची .. अंजना हिडिंबा शूर्पणखा वा सीता स्वाध्याया आगम वेद बायबल गीता सोन्यात जडवुया माणिक मोती पाचू ज्ञानेश्वरी ग्रंथि कुराण शास्त्रे वाचू वैडूर्य पोवळे पुष्कराज हिरा खाण नीलम आणिक गोमेद नवरत्ने…
-
शिदोरी – SHIDOREE
राऊळाची वाट सुंदर नि सोपी कैवल्य चांदणे खिरे घनातून घाटातून वाट चढत जाऊया डोंगरी निर्झर खळाळे बागडे पुण्याची शिदोरी सोडून वाटून खाऊ घास घास आनंदाने ओंजळीने पाणी पिऊन तहान भागेल खरेच चला पुढे जाऊ राऊळ दिसले हात जोडले मी कळस झळाळे सूर्य किरणात चंद्रकोर बीज गगनात आली अंतरी शुद्धात्मा जिनदेव माझा राऊळी गाभारा घंटेचा निनाद…
-
समयसार – SAMAY SAAR
समयसार का सार निश्चय नय व्यवहार देव शास्त्र गुरु धार भव सागर कर पार अंतर्मन की सुनो बाते बारंबार स्वधर्म खुद का जान खुदको खुदही तार अर्थ सुनेत्रा सार्थ पर से कभी न हार
-
अप्रतिम – APRATIM
रंग संगती अप्रतिम वन हरिण सती अप्रतिम कर्म तपवून जाळण्या अंगार मती अप्रतिम योग भक्तिचा जिनांच्या ध्यानात रती अप्रतिम पंथ असो कोणताही दिगंबर यती अप्रतिम श्रीमती गुण कुमारिका सौभाग्यवती अप्रतिम
-
छल्ले – CHHALLE
मोरपिशी शालूवरी .. छल्ले चांद पंखी ….. पदरा निळे गोंडे गडद .. निळी वेलबुट्टी ….. काठ निऱ्यांचा ग घोळ .. पावलात लोळे ….. जास्वंदीचे पुष्प पर्ण.. चाफ्यासंग डोले….. मोतिमाळ बोरमाळ .. तीन पदर सरी ….. कवडी माळ काळी पोत .. गळेसर लडी ….. चाफेकळी नाक भाळी .. हळदी कुंकू टिळा ….. अधर बंद पाकळ्यात ..…
-
भद्र – BHADRA
राम हृदयी राम कमली राम माझ्या श्याम नयनी राम रंगी राम वचनी राम ध्यानी राम भजनी गा सुनेत्रा राम प्रहरी आठवा बल भद्र जइनी राम बाणी कृष्ण धरणी घाम गाळे राम चरणी चाक फिरवे राम सजणी मम धनुर्धर राम करणी राम काष्ठी राम दगडी काय वर्णू राम कवनी जन्मभूमी जनक जननी गात फिरते गझल रमणी…