प्रणाम सूर्या तव तेजाला युद्ध पेटले सम्यक
सलाम वायूच्या झोताला युद्ध पेटले सम्यक
सदन शांतिचे हिमालयावर सह्याद्रीचा बाणा
कातळ काळे बुरुज गडाला युद्ध पेटले सम्यक
गस्त तराईवर गुरख्यांची जैनागम रक्षाया
साक्ष तयांची इतिहासाला युद्ध पेटले सम्यक
कृतज्ञतेची किल्ली न्यारी तळातली शोधाया
बर्फावरती रोवुन भाला युद्ध पेटले सम्यक
कोंदण मक्ता त्यात झळकतो हिरा “सुनेत्रा” नामी
भूगोली स्थापण्या जिनाला युद्ध पेटले सम्यक