-
फाल्गुन सरी – FAALGUN SAREE (RAIN IN FALGUN MONTH)
फाल्गुन मासी रिमझिमणाऱ्या झरती पाऊससरी झरती पाऊससरी …. आभाळाच्या आल्या पोरी नाचत धरेवरी नाचत धरेवरी… रिमझिम पाऊससरी धरेवर आल्या पाऊससरी … भिजले अंगण भिजल्या वाटा भिजल्या चिंब सरी भिजल्या चिंब सरी … पहाटेस कुणी कचरावेचक चाले रस्त्यावरी चाले रस्त्यावरी …. उचलून कचरा सारा सारा घरचा रस्ता धरी… घरचा रस्ता धरी … वर्दळ वाढत जाई हळुहळु…
-
वाटे – VAATE
किती ग सुंदर चंद्रकळेवर हळद कुंकवाची बोटे किती ग काळी रात्र तरीही भय ना कसले मज वाटे किती ग चंचल हरिणी त्यांचे टपोर भिरभिरते डोळे किती ग छुमछुमणारे त्यांचे पैंजण पायीचे वाळे किती देखणी गुलाबदाणी घाटदार बांधेसूदही सुगंध भरली अत्तरदाणी हृदय जणू बन फुलवारी लाल गुलाबी रंग केशरी पश्चिम भाळी ल्यालेली बाग गुलाबांची पिवळ्या ग…
-
सोट – SOT (STRAIGHT/BLUNT)
-
कू – KUU (EARTH)
हळूहळू हे वाजत आहे पानगळीतिल पान वृक्षातळीच्या पाचोळ्याला ऐकू देऊन कान पाचोळ्यातुन ऐकायाला किलबिल किलबिल गान रवीकिरणांचे भू वर आले अगणित सरसर बाण शीळ घालतो सुरभित वारा हरपुन तन मन भान लहर लहरती लता माधवी वेळावीत ग मान जरी छाटली खोडे त्यावर फुटली पर्णे सान पुनव रात्रीला शिशिर नेतसे चंद्रावरती यान उधळुन देती ऋतू सहाही…
-
लोणी – LONI (BUTTER)
-
तराई – TARAAEE
-
अनुकूल – ANUKOOL (FRIENDLY)
अनुकूलच हे द्रव्य क्षेत्र नि काळही आम्हास भूतकाळही अतीव सुंदर दिसतो बिंबात वर्तमानही जगून सुंदर उजळ भविष्यास दिगंबरांच्या जैन पथावर फुलवू काव्यात सान बालके तरुण पिढीला दिशा दाखवून जिनानुयायांच्या धर्माला नेऊ विश्वात गृहस्थ जीवन जगता जगता मोक्ष पथिक होत निर्भय आम्ही ठेवू तेवत प्रेमाची ज्योत मात्रावृत्त (मात्रा २५)