-
हृदय पाखरासंगे गावे – HRUDAY PAKHARAASANGE GAAVE
जसे वाटते तसे लिहावे त्या त्या समयी अर्थ कळावे नंतर काथ्याकूट करोनी जे जे हितकर तेच जपावे अनेक जीवांसाठी सुद्धा उपयोगी ते नित्य पडावे लिहिणाऱ्याला महत्व द्यावे ज्याचे त्याला श्रेय मिळावे फुकट कुणी ना ते लाटावे इतिहासाला जतन करावे भूगोल सुंदर घडवित जावे व्यायामाने तन घडवावे अभ्यासाने मन फुलवावे कलागुणांनी बहरुन यावे व्यवहाराला अचुक असावे…
-
गुड-गुड गाणी – GUD-GUD GAANEE
पहाट गाणे पाखरू गाते वाटिका प्रभाती दवात न्हाते चिवचिव किलबिल गुडगुड गाणी खळखळ झरझर वाहते पाणी डोलते नाचते तृणाचे पाते… गप्पा अन गोष्टी कराया नित्य हसत खेळत बोलावे सत्य जपावे सुंदर चहाचे नाते … झुळूक हवेची घरात यावी सुगंधी लहर नाकाने प्यावी गरगर फिरवित दगडी जाते … उप्पीट शिरा लोणचे खावे उदरभरण मज्जेत करावे अंगणी…
-
नारळ नटखट – NAARAL NATKHAT
तांब्यावर पानांची महिरप हळदीकुंकू टिकल्या मळवट प्याल्यामध्ये लिंबू सरबत चाले लगबग कसले खलबत पायापाशी जळी मृदुल कण आतिथ्याने नटले क्षणक्षण ओटीमधला नारळ नटखट जयात लपले कोडे अनवट जांभुळवर्णी वसन गडद खण त्यात बांधुनी दिले सजल घन
-
कृष्णामाई – KRUSHNAA MAAEE
श्रुत-पंचमीच्या दिनी जीव वाजे झिनीझिणी पुष्पदंत भूतबली दर्शनात मग्न कळी निरांजन माझ्या हाती पंचप्राण माझे गाती आदिनाथ जिनेश्वर मुक्त शांत कैलासावर सिद्धशिला प्राप्त करुनी वीस जिन सम्मेदावर वासुपुज्य चंपापुरी तीच त्यांची मुक्तीगिरी गिरणारी नेमीनाथ मस्त घाट मोक्षपाथ महावीर पावापुरी रम्य शुद्ध मुक्ती खरी कोपरा तो पाकघरी तीर्थंकर वेदीवरी मंदिरात आत्मज्योत तीच कृष्णामाई स्त्रोत
-
परडी – PARADEE
काव्यपरीचे, चरण पकडुनी, प्राप्त जाहले, सौख्याला; निंदा गर्हा, करुन स्वतःची, फक्त शरण मम, आत्म्याला.. तळ गाठाया, आत्मसागरी, उतरत गेले, खोल खरी; तटस्थ राहुन, निरखित गेले, भोवतालची, मूक दरी.. गांभीर्याने, अन धीराने, दिवा उजळिता, गाभारी; श्रद्धापूर्वक, मिटल्या नेत्री, मी जीवाची, आभारी.. भिऊन ज्यासी, बंद कवाडी, कोंडत गेले, काव्याला; ती भीती भय, सुंदर मम सय, पहा कळाले,…
-
गंडोला – GANDOLAA
फिरतो घुमतो तो गंडोला नको बावरू तू चंडोला पाय रोवुनी पकड गजाला करीत किलबिल बघत हिमाला येता थांबा हळू उतर रे पंख धवल तव उडत पसर रे गाठ मंदिरा निळ्या अंबरी स्वागत करतिल मरुत सुंदरी पिंड शिवाची बर्फामधली तुझ्याचसाठी सजली हसली नाद अनाहत अनुभूतीचा भरल्या हृदयी ऐक खऱ्याचा ब्रम्ह दर्शना साठव नेत्री परतून ये मग…
-
चल चल भिंगू – CHAL CHAL BHINGOO
चल चल भिंगू म्हणत म्हणत हा फिरे गरारा वारा नका नका रे नावगाव पुसु असो मतलई खारा ताप तापते ऊन उकळते वरवर चढतो पारा हलके हलके सरसर येती भरभर तडतड गारा अंगांगावर रोम शहारा घळघळ सरसरणारा थेंबामध्ये चिंब बिंब तन झेल झेलते धारा भुरे पाखरू किलबिल करुनी तोडे फोडे कारा हूड वासरू चरते खाते हिरवा…