Tag: Marathi Geet

  • परिमल – PARIMAL

    परिमल उधळित पुष्प पाकळ्या उमलत जाती रंग बरसती धुंद होउनी कोमल पाती कोमल पाती मुग्ध कळ्यांशी माझे नाते गरगर फिरतो हात आणखी दगडी जाते जात्यामधुनी पीठ झरझरे ऐकत किलबिल वाऱ्यासंगे गात येतसे झुळझुळ परिमल

  • प्याल्यामध्ये पेय भरावे – PYAALYAA MADHYE PEY BHARAVE

    प्याल्यामध्ये पेय भरावे भरून गाण्या हात पाय अन ध्येय असावे तरून जाण्या जाण्यासाठी दूरदूरवर पैल तटावर भटकत असतो गात गुराखी ताल सुरांवर बासरीतुनी गीत उतरते डोळ्यांमध्ये थेंबे थेंबे प्रेम बरसते प्याल्यामध्ये

  • झुलते सुंदर वेल – ZULATE SUNDAR VEL

    झुलते सुंदर वेल मांडव सोसे फुलभार कुंपण ओले केतकी परसदार अन माड परसदार अन माड नाहतो जलधारांनी बहरुन गेले रान गातसे निर्झर गाणी झरा वाहतो मुक्त मनाने पाणी उडते चिंब भिजोनी एक सान तृणबाला झुलते

  • गिरवुन गिरवुन – GIRAVUN GIRAVUN

    गिरवुन गिरवुन अक्षरे दे शब्दांना धार कलम करी तू घेउनी कर भवसागर पार कर भवसागर पार बांधुनी साकव मोठा उत्तम आर्जव ठेव अंतरी लाघव ओठा अंतर आतम तार जुळाया गाउन फुलवुन सुंदर वचने कोर त्यावरी गिरवुन गिरवुन  

  • सुकुमार – (delicate)

    कोण पऱ्यांना अमुच्या सुंदर आवडती सुकुमार… शोधुन काढू पिंजुन विश्वा शूर असे सरदार… मधुबालेसम नाजुक कन्या कुणी न स्पर्धक त्यांच्या पुण्या गुढी उभारुन त्या सत्याची उलथतील सरकार… ऐनकातुनी रोखुन बघती कपट जाळती मधुर हासती शोभुन दिसती तळपुन उठती जणू करी तलवार… अहंपणाचा अर्थ न ‘मी’ पण तू तू तू तू नसते शिकवण उपजत प्रीती तिरकस…

  • वरण भात – VARAN BHAAT (rice and dal)

    वरण भात जरि त्यास आवडे ताक कण्या तिज आवडती जात्यावर ती ज्वारी भरडे ताक कण्या तिज आवडती तोलुन मापुन तो खातो पण हवे तेवढे खाते ती बाथ घेतसे टबामधे तो शुभ्र प्रपाती न्हाते ती भाताने बघ वजन वाढते नकोच खाऊ म्हणते ती जिमला जावे तो म्हणतो तर फिरण्या जाऊ म्हणते ती तो म्हणतो तिज प्रीत…

  • झोपेल बाळ शांत – ZOPEL BAALH SHAANT

    चल ये लिहूत गझला …… …… दोघे मिळून आता ही पायवाट ओली ———– भिजवू दवात आता … वाटेवरी दुतर्फा टाकू बिया फळांच्या जपतील पादचारी अंकूर नवतरूंचा … वाढून उंच झाडे झुलतील वारियाने फांदीवरी बसोनी गाऊत प्रेमगाणे … येतील पाखरे मग बांधावयास घरटी किलबिल ऐकुनीया रचतील कोण गोष्टी … छायेत गर्द झोपे पान्थस्त सावलीला होताच सांज…