Tag: Marathi Geet

  • मनमौजी – MANMOUJI(OPINIONATED)

    In this poem the poetess says, I am very happy person. I am the queen in my house. I want to live as I want. I want to sing songs, live in house on the hilltop. I shall fly kite in the sky. I want to cut all kites flying in sky, if they fly like fluttering…

  • चमत्कार – CHAMATKAR(MIRACLE)

    दर्शन दे ईश्वरा… भिवविते जन्म मरण अन जरा चमत्कार हा असा घडावा मनातला भ्रम गळुन पडावा कटू जरी मज सत्य कळावे इच्छा ही प्रभुवरा… हृदयी गुंता होऊन बसता अज्ञानातिल सुख कुरवाळता एक घाव अन दो तुकडे हा उपाय वाटे बरा… आस मनीची पूर्ण होऊदे प्रेमामध्ये चिंब न्हाऊदे खरे न खोटे सारे कळूदे भेट मला प्रियकरा…

  • ऋतू सुखाचे – HAPPY SEASONS

    ऋतू सुखाचे  येतिल आता धरणीसंगे गातिल आता पडेल पाऊस वेळेवरती धान्याने मग भरतिल पोती फळ फळावळ भाजीपाला गाई गुरांना चारा ओला कमी न काही पडेल आता ऋतू सुखाचे येतिल आता धरणीसंगे गातिल आता रानामध्ये झरे वाहतिल झाडांवरती घरटी झुलतिल फूलपाखरे आणिक भुंगे हवेत उडतिल संगे संगे माणूस आता होईल दाता ऋतू सुखाचे येतिल आता धरणीसंगे…

  • प्रिय आमुचा देश – OUR DEAR COUNTRY

    India is our country. This poem is a patriotic poem. Though there variety in languages, costumes we love our country. Unity in variety is our power. विविध प्रांत अन विविध बोली, रंग, रूप जरी वेश; भारत अमुचा देश! प्रिय आमुचा देश!! गोड गोजिऱ्या मुली आमुच्या, शिकत राहतिल कला नी विद्या, तृण-बाळांना सुद्धा जपतिल, कधी न…

  • सृजनाचा हुंकार – VOICE OF CREATION

    दिवसामागुन दिवस उलटले महिने वर्षे किती नेमे येते नवे वर्ष हे कौतुक त्याचे किती क्याटरिना अन रिटा सुनामी गर्जत हे आले बेचिराख जरी जीवन झाले राखेतुन फुलले शिशिरामध्ये झडती पाने वसंत देतो फुले जुन्या क्षणांच्या हिंदोळ्यावर पुन्हा नव्याने झुले तोच सूर्य अन तोच चंद्रमा रोजच भासे नवा चैतन्याची खूण ओळखा हृदयामधला दिवा मातीमधुनी पुन्हा थरथरे…

  • सुंदर घुमविती घागरी – TO MOVE THE POTS

    रंग कणिका अंबरातल्या उधळिल्या सागरी सुंदर घुमविती घागरी घागरी घुमविती घागरी यज्ञ पेटला संधीकाली लोभ-मत्सरा जाळे होळी बालके वाजविती भेरी सुंदरा…. ठिणग्या बरसत वीज नाचते धरणीवरती अंबर झुकते लालस पिवळी हिरवी निळसर भक्तिची वस्त्रे जरतारी सुंदरा ….. पाहून उत्सव नभ हे हसले गर्जत गर्जत मेघ वर्षले मृदगंधाने झेले भरले बाग उमलली धरेवरी गं धरेवरी