-
एकदाच फक्त सांग – EKADAACH FAKT SAANG
एकदाच फक्त सांग माझियात काय खास मापट्या समान नाक की सुडौल पाय खास पात हरित करकरीत सळसळे खुल्या उन्हात जणु उनाड चंचला म्हणे सुरात हाय खास भाज पात फोडणीत लाल तिखट मीठ वरुन डाळ घाल पीठ पेर आर्द्रता भराय खास अक्षरात इंग्रजी सजेल गझल घाटदार त्यात मस्त झेड केंद्र गुप्त एक्स वाय खास तेहतीस कोट…
-
काफिया रदीफ खास – KAAFIYAA RADEEF KHAAS
काफिया रदीफ खास वेगळीच गझल आज वृत्त तेच चंचलाच पण सुखांत आज बाज लाट लाट उसळताच खळखळे भरात नाद हा समुद्र भावभोर अंतरी उधाण गाज सोडलेस तू जलात तारु स्वैर वादळात धीर मी न सोडलाय सोडलेन कामकाज ओहटीत नीर शांत शारदीय चांदरात मौन सोड बोल भांड पैंजणे बनून वाज वीर नार देतसे समुद्र देवतेस अर्घ्य…
-
शुभ्र कुंतलात सांग – SHUBHR KUNTALAAT SAANG
शुभ्र कुंतलात सांग गुंतणे अता कशास होउया तरंगरूप बिंब सांगते जलास आस संपताच भास दूर जाय क्षितिजपार हारजीत कागदीच जिंकले कुणी कुणास? भांडण्यास भेटलो उन्हामधील चांदण्यात तीच वेळ खूप मस्त वाटली जरी न खास भावभोर लोचनात सांजस्वप्न दाटताच देतसे गुलाबपुष्प कंटकासही सुवास तू तसाच मी अशीच भेटण्यास ये निवांत रंगुदेत मैफिलीत माझिया-तुझ्या घरास वृत्त –…
-
मधुर मधुर मस्त काळ – MADHUR MADHUR MAST KAAL
व्यक्त व्हावयास हाच मधुर मधुर मस्त काळ नयन वाचण्यास हाच मधुर मधुर मस्त काळ तू गुलाब मी शबाब तू नवाब मी शराब प्रीत प्राशण्यास हाच मधुर मधुर मस्त काळ लोचनात बिंब पाहताच भ्रमर का अधीर अधर चुंबण्यास हाच मधुर मधुर मस्त काळ पुस्तकात मैफिलीत चांदण्यात नाचतेच गझल ऐकण्यास हाच मधुर मधुर मस्त काळ भांडणे पुरे…
-
झळाळणार – ZALAALANAAR
जे असेल पूर्ण सत्य ते सदा झळाळणार दगड मंत्र बोलणार अन मृदा झळाळणार रंग रूप अन स्वरूप प्रकटतील गुण अनेक मुग्ध मौन हर कळीत नव अदा झळाळणार थंड बोचऱ्या हवेत मोहरून शेत रान सावळ्या भुईमधील संपदा झळाळणार मोति आणि पोवळ्यात पारिजात बहरताच रातराणिच्या फुलांत शारदा झळाळणार चंद्र चूर चांदण्यात चंचला झुले हवेत गोरट्या तिच्या करात…
-
आजकाल बोलण्यास – AAJA-KAAL BOLANYAAS
आजकाल बोलण्यास सवड नाय ऐकण्यास कोण का म्हणेल सांग ये निवांत भेटण्यास वेळ ना तयांस अन्न रांधण्यास खावयास पण सदा तयार तेच शर्यतीत धावण्यास खर्च जाहल्यावरी हिशेब चोख ठेवतात गुप्त फुकट जे मिळेल ते बसून लाटण्यास रंगरूप बदलतात हायफाय वागतात जोखती दुजांस फक्त आरशास टाळण्यास टापटीप राहतात लाजतात ते श्रमांस लाजकाज सोडतात फक्त पाय चाटण्यास…
-
फेडणार पाप कोण – FEDANAAR PAAP KON
पुण्य खूप कमविलेस फेडणार पाप कोण कर्मनिर्जरा तुझीच द्यावयास जाप कोण हा पुढे उभाय वाघ तापमापि ही प्रचंड प्रश्न फक्त एवढाच मोजणार ताप कोण बंदुकीत मी कधीच दारु पूर्ण ठासलीय भांडणास रंग हाच ओढणार चाप कोण हा महाल नाहतोय चांदण्यात संपदेत उंबऱ्यात ज्ञानदीप उलथणार माप कोण मंगळास काळसर्प कोंडतोय कुंडलीत सापळा पुरा तयार कोंडणार साप…