-
पाऊस गाणी – PAAOOS GAANEE
ओढाळ पाणी धावते रानी फुले पाने झरे पाऊस गाणी गावया कोणी इथे आले बरे गोठ्यात धेनू अंगणी चाफा फुलांनी लगडला जात्यात दाणे सांडते पीठी तशी ओवी झरे आकाशगंगा सावळ्या मेघा म्हणे जा रे घना शेतात ज्वारी बाजरी डोले कणिस मोतीभरे उडतात पक्षी देखणे फांदीवरी घरटे झुले चाखावया मकरंद मध पुष्पांवरी फुलपाखरे बगिचे नवे झाले किती…
-
गंधार – GANDHAAR
पाऊस हा येणार रे भिजवायला मजला पुन्हा सांगावया गोष्टी जुन्या रडवायला मजला पुन्हा त्या वादळी रात्रीतले ते भेटणे माझे तुझे आहे पुरा तो चांदवा हसवायला मजला पुन्हा काहीतरी कोठेतरी घडलेच होते त्याक्षणी सांगू नको भलते असे फसवायला मजला पुन्हा शृंगार ना केला तरी गंधार होता अंतरी शृंगारली होती धरा खुलवायला मजला पुन्हा सांजावली होती धरा…
-
दीपावली – DEEPAAVALEE
नाही कधी संपायची हृदयातली माझ्या गझल सत्यात आता उतरली स्वप्नातली माझ्या गझल सांगावया ऐकावया गुज अंतरीचे दिव्य हे येते पुन्हा धावून ही श्वासातली माझ्या गझल नाही तिला भय कोणते नाचावया अन गावया साकारते शिवरूपता भासातली माझ्या गझल पाण्यावरी हृदयातल्या गझला किती झंकारल्या आता पुरे झाले म्हणे ओठातली माझ्या गझल आली पुन्हा दीपावली काव्ये नवी साकारली…
-
मंदाकिनी – MANDAAKINEE
पाण्यावरी, नाचू कशी, तू सांग मज मंदाकिनी! आहे किती हे खोल जल! दे थांग मज मंदाकिनी !! मज आवडे धावावया, खेळावया नीरात या; बाळापरी म्हणतात यावर रांग मज मंदाकिनी… गालावरी भुवईवरी हे तीळ गोंडस साजिरे; आहेत हे सुंदर जरी! दे वांग मज मंदाकिनी.. टांग्यातुनी रिक्षातुनी, जातात हे! फिरतात ते! का रोज ते, देती अशी पण…
-
मैफल – MAIFAL
हे पोलके झाले जुने टाकून देना साजणे आणेन चोळी जांभळी कशिदा तुझा तू रेखणे ये राहण्या माझ्या घरी हिंडू फिरू पाहू पुणे भरवूत मैफल गझलची येतील दर्दी पाहुणे आता सुनेत्रा बासना गझलेस पाणी पाजणे वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली – गा गा ल गा/ गा गा ल गा/
-
भार्या – BHAARYAA
संपेल आता जाळणे अन प्रीत सुंदर टाळणे ढग डोंगरी पाणी झरे आणू कशाला गाळणे रंगून सुकले रंगही आता पुरे हे वाळणे येता समीप मधुघटिका शंकेस का या पाळणे आनंद मोदे विहरतो डोळे नको मग गाळणे भार्या खरी तव सुंदरी परकीवरी का भाळणे वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली – गा गा ल गा/ गा गा…
-
सोनिया – SONIYAA
वचनास मम जागावया गाते शिरा तानोनिया कोठून त्याही उगवल्या फुकटातले लाटावया माझीच ही आहे धरा दासी न ही तुडवावया घाटात कोणी टाकला तो कांब मज पाडावया चल संगती माझ्या अता तो हात हाती घ्यावया डोक्यावरी ना बैसले बसले इथे रक्षावया मैत्रीतला माझ्या दुवा आहे सुनेत्रा सोनिया वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली – गा गा…