-
शिंपला – SHIMPALAA
चल खावया पाणीपुरी भरल्यात साऱ्या घागरी मम शारदा विद्या सई रेखाटते मज हासरी निल सुषम शैला पद्मजा हाती तिच्या फुल टोकरी उन्मेष झाला मेष अन नव कल्पना झाली परी मनमोहिनी मंदाकिनी घुमवीत आहे बासुरी हा कांचनी मृदु शिंपला भिजला दवाने अंतरी आली फळे वाटावया सुंदर सुनेत्रा नाचरी वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली – गा…
-
व्यवहार – VYAVAHAAR
कोणास ना बोले कुणी पण बोलते हृदयातुनी व्यवहार जो जाणे खरा तो निश्चयी आहे गुणी मी काफियाने बांधली कविताच ती होती जुनी जेव्हा तिला तू डिवचले ती बोलली फुत्कारुनी हे वृत्त आहे बेरकी अन गझल माझी देखणी वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली – गा गा ल गा/ गा गा ल गा/
-
सल्लेखना – SALLEKHANAA
चल घे अता सल्लेखना अन आत्महत्या टाळना फासे उगा फेकू नको असते जुगारी वासना आता पुरे हे पूजने त्यांच्यात काही राम ना खोट्याच त्यांच्या घोषणा माझी खरी ही साधना काहूर उठता अंतरी मौनात केला सामना जमलेच ना मज टाळणे शिव सत्य सुंदर भावना वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली – गा गा ल गा/ गा…
-
रांगडी – RAANGADEE
आलेच ते बघ गावया खोटे मढे उचलावया भित्री कधी नव्हतेच मी त्या नाटक्यांना भ्यावया मतदान मी केले खरे सरकार माझे यावया का घाबरे ती मासळी पाण्यात या उतरावया हे चाहते आले नवे गझलेत माझ्या न्हावया आहे सुनेत्रा रांगडी दगडांस त्या फोडावया त्यांनीच केले लंगडे फुकटात कुबड्या द्यावया वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली – गा…
-
काय झाले – KAAY ZAALE
मी काय होते काय झाले भलतीच हाय नि फाय झाले सांभाळण्या ही गझल माझी मी भांडणारी माय झाले होते जरी मी देवमाता का मारकूटी गाय झाले मी मस्तकी होते जरी तव तुज चालवाया पाय झाले मी दुग्धगंगा वाहणारी तापून हलके साय झाले वृत्त – अक्षरगण वृत्त, मात्रा १६ लगावली – गा गा ल गा/ गा…
-
समीक्षक – SAMEEKSHAK
काहीच ना मी बोलले त्यांचेच त्यांना झोंबले उपदेश सारा ऐकला अन घ्यायचे ते घेतले गोष्टी जरी होत्या जुन्या मी त्यात मजला शोधले गझलेत मी बुडले जरी मी ना कधीही गंडले ज्यांना मिळाले फुकटचे त्यांनीच पैसे वाटले बोलाल जर उडवू तुम्हा फर्मान त्यांनी सोडले त्यांनी न लिहिली ओळही पण अर्थ मोठे काढले निंदाच करुनी छापल्या परखड…
-
पुरुषार्थ – PURUSHAARTH
का पसरले झोळीस तू गोंजारले टोळीस तू का तेल पुन्हा ओतले भडकावण्या होळीस तू ते हात सुंदर साजिरे का बांधले मोळीस तू का ठेवला पत्रा जुना भाजावया पोळीस तू पुरुषार्थ मोठा दावला खिजवून त्या भोळीस तू जर लाज तुज ना वाटली का खोडले ओळीस तू वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली – गा गा ल…