Tag: Marathi Ghazal

  • ठिबक सिंचन – THIBAK SINCHAN

    काय बोलू काय पाहू मज कळेना अंतरीचे चाललेले गुज कळेना किलबिलाटातच पहाटे ऐकलेली पाखरांची मधुर ती कुजबुज कळेना कैक पूजा मांडल्या कल्याणिकांच्या का तुला पण शब्द सुंदर भज कळेना प्रवचने शास्त्रे पुराणे पाठ तुजला प्रेममय भाषा गझलची तुज कळेना घाम तो गाळून फुलवी द्राक्षबागा फक्त त्याला ठिबकसिंचन निज कळेना वृत्त – मंजुघोषा , मात्रा २१…

  • हिमगौर – HIM GOUR

    वर्षताना दुग्धधारा चांदण्यांच्या चुंबितो ठिणग्यांस वारा चांदण्यांच्या गोल या पात्रात हसता बिंब माझे हलवितो गर्दीस तारा चांदण्यांच्या वेलदोडे केशराच्या चार ओळी मिसळतो क्षीरात झारा चांदण्यांच्या बैसुनी कोजागिरीला शिखरजीवर वेचिते हिमगौर गारा चांदण्यांच्या ओतता दाणे अनामिक ओंजळीने घळघळे ताटात पारा चांदण्यांच्या वाजता पावा हरीचा गोप येती कापण्या रानात चारा चांदण्यांच्या तुंबड्या भरतील ऐदी आजसुद्धा बसवुनी शेतास…

  • पारिजात – PAARIJAAT

    वर्षते श्रावणात आता ती वेचते पारिजात आता ती जहरिली तोडण्यास नक्षत्रे होतसे काळरात आता ती सापडे ना इथे कुणालाही राहते अंबरात आता ती मोजुनी अचुक सर्व मात्रांना माळते कुंतलात आता ती कूप ना आवडे बघ तिला हे डुंबते सागरात आता ती चांदणे उधळते करांनी दो नाचते आश्विनात आता ती लज्जिता भामिनी सुनेत्राला पाहते लोचनात आता…

  • व्हिला -VHILAA

    काढुनी ऐनका मुला पाहू घालुनी ऐनका तुला पाहू न्यूनगंडासवे अहंगंडा काढुनी साठल्या जला पाहू मुक्त फुलपाखरे उडायाला वासना फुंकुनी फुला पाहू जाउया भटकण्या नव्या देशी गगनचुंबी सदन व्हिला पाहू बरसतो भूवरी कसा धो धो सावळा मेघ तो चला पाहू हिरवळी माजता दलदलीने वाळवंटात काफिला पाहू बंद तो राहिला कुणासाठी जाहला आज तो खुला पाहू वृत्त…

  • असे झाले – ASE ZAALE

    लालका गाल हे असे झाले चुंबिता भाल हे असे झाले सूर ना लागला लय खरी पण सोडता ताल हे असे झाले कारवां चालला दुज्या गावा उठविता पाल हे असे झाले स्पर्शिता थरथरे किती काया आज ना काल हे असे झाले तिजसवे झिंगले खरे वेडे पाहुनी चाल हे असे झाले वृत्त -लज्जिता, मात्रा -१७ लगावली –…

  • भुई नाचे – BHUEE NAACHE

    सावळी सावळी भुई नाचे त्यावरी वल्लरी जुई नाचे पाच बोटांवरी बसोनीया सान कैरीतली कुई नाचे वस्त्र आहे जरी भरड त्यावर होत मागे पुढे सुई नाचे मेघना दामिनी कडाडे अन मस्त तो मोर थुइ थुई नाचे वारियाने उडे झुले धावे स्वैर ती रानची रुई नाचे वृत्त -लज्जिता, मात्रा -१७ लगावली – गा ल गा/गा ल गा/ल…

  • धरण – DHARAN

    पूर्ण भरता धरण आसवांचे ऊन्ह करते हरण वासनांचे अंबरी विहरता मेघमाला रान वाटे जणू मोतियांचे चुंबिता वात तो घन घनांना वीज माळे तुरे तारकांचे शीत धारांसवे धावताती जलद हे भूवरी भावनांचे तृप्त होता धरा जीवसृष्टी पीक येई नवे चांदण्यांचे वृत्त – भामिनी लगावली – गा ल गा/गा ल गा/ गा ल गा गा