Tag: Marathi Ghazal

  • मी उभी कमळात – MEE UBHEE KAMALHAAT

    मी उभी कमळात सुंदर ओंजळी भरभरुन देण्या वाहणारी नीर धारा घागरी भरभरुन देण्या अंगणी धनधान्य सांडे अंबरातिल चांदण्यांसम हात दोन्ही सज्ज माझे पोतडी भरभरुन देण्या रेखिते मी काव्यचित्रे कृष्णवर्णी मौक्तिकांनी भावभरली शब्दसुमने टोकरी भरभरुन देण्या मी वडाचे बीज इवले भूवरी उगवून येते बहरते मी पसरते मी सावली भरभरुन देण्या अचुक तोले मी ‘सुनेत्रा’ खास असुनी…

  • खूप मस्त – KHOOP MAST

    खूप मस्त मस्त वाटतंय देह वस्त्र चुस्त वाटतंय देणं घेणं संपल्यावरच केलं सारं फस्त वाटतंय उरलं सुरलं देत आप-धन बरसतोय हस्त वाटतंय रागरंग ओळखतच मन घालतेय गस्त वाटतंय मेघ दाटलेत गगनभर विश्व अवघं सुस्त वाटतंय आम आदमीच फक्त इथं लावणार शिस्त वाटतंय का बरे कुणास आजपण काव्य माझं स्वस्त वाटतंय अक्षरगण वृत्त (मात्रा १४) लगावली…

  • हृदयी माझ्या – HRUDAYEE MAAZYAA

    हृदयी माझ्या फूल उमलते नित्य गुलाबाचे म्हणून जपते दवा बाटली पथ्य गुलाबाचे मिटून डोळे मौनामध्ये गझल चुंबिताना पापण काठी झुले गुलाबी सत्य गुलाबाचे व्यथा प्रीतिची प्राशुन मदिरा नशेत असताना अश्रू होउन झरते गाली शल्य गुलाबाचे आधी मैत्री नंतर प्रीती हेच खरे जाणा म्हणून असते काट्यांशीही सख्य गुलाबाचे गुलाबपुष्पे रंगबिरंगी दूर प्रिय चालली तुझे चोरुनी हृदय…

  • मीच ती बासरी – MEECH TEE BAASAREE

    मीच ती बासरी तुझ्या अधरी सुंदरा नाचरी तुझ्या अधरी चालते धावते कधी झुलते रंगलेली परी तुझ्या अधरी चंचला चांदणे जरी उधळे होतसे बावरी तुझ्या अधरी चिंब तव डुंबुनी निळ्या नयनी राधिका लाजरी तुझ्या अधरी मौन ती दामिनी शिळा बनली जाहली वैखरी तुझ्या अधरी बघ हळू उमलली गुलाब कळी लोळते साखरी तुझ्या अधरी अक्षरगणवृत्त – गालगा/गालगा/लगाललगा/(मात्रा…

  • भन्नाट माझ्या – BHANNAAT MAAZYAA

    भन्नाट माझ्या काफियाच्या एकदा ओठात ये जागेपणी जमले जरीना चोरुनी स्वप्नात ये वाऱ्यापरी मन उधळते अन धूळ माती उडविते माखून काया त्या धुळीने माझिया स्वर्गात ये जाणून आहे आस भारी मी तुझ्या कवितेतली तिज वाजण्या थंडी गुलाबी तू तिच्या देहात ये सैलावल्या बघ मेघमाला गगन निळसर जाहले भिजवावया पुन्हा धरेला श्वेत मम अभ्रात ये आवाज…

  • चिडावे रडावे – CHIDAAVE RADAAVE

    चिडावे रडावे परी ना कुढावे मला जे कळाले तुलाही कळावे यमाला सुपारी जरी तू दिली रे तिला चोरुनी मी कुटावे न खावे तुझी जिंदगानी मला खूप प्यारी म्हणोनी सख्या तू पडावे लढावे किती प्रेम माझे अजूनी तुझ्यावर नयन चुंबण्या तू स्वप्नात यावे तुझे मौन गाणे जगा ऐकवाया तुझ्या बासरीचे अधर मीच व्हावे अक्षरगणवृत्त (मात्रा २०)…

  • वृत्त देखणे – VRUTT DEKHANE

    वृत्त देखणे फक्त नसावे वृत्तीसुद्धा हवीच सुंदर गझल असूदे जीर्ण जुनी मम नित्य भासते नवीन सुंदर प्रभातसमयी शुभ्र मोगरा तप्त दुपारी जास्वंदीसम सायंकाळी गझल चमेली उत्तररात्री शिरीष सुंदर काव्य चित्र अन शिल्पामधुनी मूर्त कुणी नारीला करिते त्याहुन मोहक लेक आपुली गझल बावरी सजीव सुंदर आकाशाची निळी पोकळी सौरमंडळे ग्रह ताऱ्यांची पृथ्वी म्हणजे ग्रहगोलांतिल गझल क्षमाशिल…