-
सर्व कळव – SARV KALHAV
शब्द फिरव वही भरव पटापटा धुणे बडव काना दे नीट गिरव मात्रांना अचुक बसव जमीन कस पालं उठव खण खड्डा परत बुजव पुष्पांनी देह सजव कवितेने हृदय फुलव सुनेत्रास सर्व कळव मात्रावृत्त – ६मात्रा
-
मंगल मंगळ – MANGAL MANGALH
मंगल मंगळ नकोच कलकल चिखलच मलमल कमळे श्यामल वारा शीतल पांघर वाकळ उघडे कातळ पुष्पे कोमल मात्रावृत्त – ४ मात्रा
-
कुरुपतेचा अस्त – KURUPATECHAA AST
सुस्त नाही मस्त आहे मी मराठी चुस्त आहे बहरले लावण्य माझे भोवताली गस्त आहे वाहनांचा वेग नडतो जीव येथे स्वस्त आहे श्वानही वेळेत येतो लावलेली शिस्त आहे संस्कृतीला जपत म्हणते हात नाही हस्त आहे खीर ना पात्रात उरली जाहली ती फस्त आहे सुंदरा हसते ‘सुनेत्रा’ कुरुपतेचा अस्त आहे वृत्त – गा ल गा गा, गा…
-
जांभई – JAAMBHAEE
जांभई येतसे झोपना बाळही झोपले झोपना हे धुणे साठले रोजचे फक्त मी धूतसे झोपना त्रासका हा तुझा आजही पाहुणे यायचे झोपना कोठली गोष्ट मी सांगुरे चांदणे लोपले झोपना गीत तू गा सखे गोडसे चंद्रिका सांगते झोपना वृत्त – गा ल गा, गा ल गा, गा ल गा.
-
अधीर मस्त नाचरा – ADHEER MAST NAACHARAA
स्वरात कंप कापरा अधीर मस्त नाचरा मधाळ धुंद बावरा अधीर मस्त नाचरा कवाड बंद का असे उनाड वात तापण्या झरावयास मोगरा अधीर मस्त नाचरा लिहावयास लावणी भिजेल आज टाकही बनेल लाज-लाजरा अधीर मस्त नाचरा तुलाच चुंबिण्या प्रिये झुलेल श्रावणात तो उडे धरून कासरा अधीर मस्त नाचरा कपोत हूड गोल तो खुलेल पावसात या म्हणेल गाच…