Tag: Marathi Ghazal

  • चिरी – CHIREE

    सुकुमार पाकळ्यांचे जाणून भाव काही रानातल्या फुलांचे घडवू जडाव काही लढण्यास आम जनता आहे तयार जेथे तेथे रणांगणी मी सोसेन घाव काही कुजणार संपदा ही येताच मोड त्याला मुलगी म्हणे पित्याला करते लिलाव काही भालावरी चिरी ती रेखून आज आली पाते तिला सुरीचे म्हणतात राव काही ज्यांच्यात हे पडोंनी होतात जायबंदी ते बुजाविण्यास खड्डे घालू…

  • सुगंध-लीला – SUGANDH-LEELAA

    रंगात रंगुनी मी जाणार पंचमीला समृद्ध फाल्गुनाच्या बघुनी सुगंधलीला कोकीळ तान घेता आंब्यावरी सुखाने वेळू बनात वारा गाईल संगतीला येई वसंत मित्रा भिजवावयास तुजला मिटवून टाक शंका सांगेल मैत्रिणीला अंगावरी सरी घे होण्यास चिंब पुरते झरतील प्रेमधारा मातीत पेरणीला मृदगंध कोंडलेला वार्यासवे निघाला मी दूत प्रेमिकांचा सांगेल साजनीला वृत्त – गा गा ल गा, ल…

  • युद्ध – YUDDHA

    रणांगणावर युद्ध पेटले गळे इथे अवरुद्ध जाहले विशाल पर्वत गर्द पाहुनी किती दिसांनी बुद्ध हासले हिमालयावर बर्फ फोडण्या करीत तांडव वृद्ध  नाचले पिढी जुनी बरबाद जाहली तरूण सारे क्रुद्ध जाहले जळून जाता क्षार तापुनी निळे सरोवर शुद्ध भासले वृत्त – ल गा ल गा गा, गा ल गा ल गा.

  • शुभ्र झरा – SHUBHRA ZARAA

    शुभ्र झरा खळखळतो आहे तुषार अगणित दळतो आहे पूर्ण जरी ना कळला मजला थोडा थोडा कळतो आहे वेलींवरच्या कळ्या बघाया मागे मागे वळतो आहे जे झाले ते बरे तरीही उगाच तो हळहळतो आहे पदर उडविण्या मुग्ध प्रियेचा पवन किती सळसळतो आहे

  • स्वप्न नवे – SWAPN NAVE

    तुज पाहते तुज ऐकते मज एवढेच कळे प्रिया मनी मानसी खग गातसे उबदार कंठ वळे प्रिया पडताच स्वप्न नवे निळे दव प्राशुनी खिरते निशा हसऱ्या उषेस पहावया नयनात डोह तळे प्रिया घन सावळा गगनी फिरे चमके नभी बिजली जरी हृदयात प्रीत जपावया भय सोड तू सगळे प्रिया उचलायचा न मला अता नच रिक्त वा भरला…

  • शिशिर वारे चालले – SHISHIR VAARE CHAALALE

    बावऱ्या गझलेस माझ्या स्थैर्य आता लाभले शेर सारे प्रकटलेले अंतरातुन उजळले कलम हाती घेउनी मी फोडता या हिमनगा शुभ्र मौक्तिक चूर्ण माझ्या भोवताली सांडले ना सिकंदर व्हायचे मज ना गुरूही व्हायचे जिंकण्या हृदये फुलांची मी बहर हे माळले गोठल्या झाडात पुन्हा आवाज काही गुंजता मृदुल हिरव्या पालवीने अंग त्याचे रंगले शब्द मोहक अर्थ सुंदर वृत्त…

  • ऐनक – AINAK

    उंचावुन तव रेखिव भृकुटी शरसंधाने मरतो मी मिटल्या नेत्रा चुंबिताच तू जिवंत होउन उठतो मी सजणे धजणे पिंड न माझा असा न भावे स्वतःस मी ऐन्यावरची धूळ झटकता मम रूपावर भुलतो मी सतेज कांती ताठ नासिका ऐनक नीतळ नजरेचा हनूवटीवर खळी पाडुनी किती लाघवी हसतो मी कर्तव्याचे मला न ओझे तो तर माझा धर्म खरा…