-
आज मी नाहीच तेथे – AAJ MEE NAAHEECH TETHE
श्वास त्यांचा मोकळा झाला परंतू… आज मी नाहीच तेथे जाणत्यांची वाहते भाषा परंतू … आज मी नाहीच तेथे फोडण्या नेत्रांस माझ्या लेखणीने… आंधळे सारे निघाले पोचले ते माझिया गावा परंतू … आज मी नाहीच तेथे वादळी मेघांपरी ते वर्षताना… मंदिरी वाजेल घंटा अंतरीचा नाद तो माझा परंतू… आज मी नाहीच तेथे गोठल्या आकाशगंगा गारठ्याने… गोठला…
-
जमणार नाही- JAMANAAR NAAHEE
काळजाशी बोलल्याखेरीज माझ्या… मौन हे माझे तुला कळणार नाही … काळजाला हात मी घालू कशीरे … काळजाला दुखविणे जमणार नाही … काळजाला चुम्बते मी पापण्यांनी… वार करणे भिजविणे रुचणार नाही सरळ कर तू वार मी हटणार नाही… दाद दे! हा हट्ट मी करणार नाही… दाद द्यावी लोचनांनी आसवांनी… हलविल्याविन काळजा हलणार नाही सर अता येऊन…
-
गझल लिहू – GAZAL LIHOO
ज्यात काफियासुद्धा नाही अशी आगळी गझल लिहू भजले नाही ज्यात कुणाला असे वेगळे भजन लिहू नियमावलीही अशीच बनवु अपवादाला नियम लिहू शब्द आणखी अक्षर विरहित टिंबटिंबचे कवन लिहू अंबर आभाळी आकाशी नाव नभाचे गगन लिहू कुंपण घालुन बोरीभवती पाटीवरती सदन लिहू जुळवायाला अचूक मात्रा डोळे झाकुन नयन लिहू अलामतीला ठेवु सलामत वायुऐवजी पवन लिहू धूसर…
-
चिरी – CHIREE
सुकुमार पाकळ्यांचे जाणून भाव काही रानातल्या फुलांचे घडवू जडाव काही लढण्यास आम जनता आहे तयार जेथे तेथे रणांगणी मी सोसेन घाव काही कुजणार संपदा ही येताच मोड त्याला मुलगी म्हणे पित्याला करते लिलाव काही भालावरी चिरी ती रेखून आज आली पाते तिला सुरीचे म्हणतात राव काही ज्यांच्यात हे पडोंनी होतात जायबंदी ते बुजाविण्यास खड्डे घालू…
-
सुगंध-लीला – SUGANDH-LEELAA
रंगात रंगुनी मी जाणार पंचमीला समृद्ध फाल्गुनाच्या बघुनी सुगंधलीला कोकीळ तान घेता आंब्यावरी सुखाने वेळू बनात वारा गाईल संगतीला येई वसंत मित्रा भिजवावयास तुजला मिटवून टाक शंका सांगेल मैत्रिणीला अंगावरी सरी घे होण्यास चिंब पुरते झरतील प्रेमधारा मातीत पेरणीला मृदगंध कोंडलेला वार्यासवे निघाला मी दूत प्रेमिकांचा सांगेल साजनीला वृत्त – गा गा ल गा, ल…
-
युद्ध – YUDDHA
रणांगणावर युद्ध पेटले गळे इथे अवरुद्ध जाहले विशाल पर्वत गर्द पाहुनी किती दिसांनी बुद्ध हासले हिमालयावर बर्फ फोडण्या करीत तांडव वृद्ध नाचले पिढी जुनी बरबाद जाहली तरूण सारे क्रुद्ध जाहले जळून जाता क्षार तापुनी निळे सरोवर शुद्ध भासले वृत्त – ल गा ल गा गा, गा ल गा ल गा.
-
शुभ्र झरा – SHUBHRA ZARAA
शुभ्र झरा खळखळतो आहे तुषार अगणित दळतो आहे पूर्ण जरी ना कळला मजला थोडा थोडा कळतो आहे वेलींवरच्या कळ्या बघाया मागे मागे वळतो आहे जे झाले ते बरे तरीही उगाच तो हळहळतो आहे पदर उडविण्या मुग्ध प्रियेचा पवन किती सळसळतो आहे