Tag: Marathi Ghazal

  • गझलानंद – GAZALAANAND

    त्रिशंकुची चार टोके, असतिल ज्याच्या पृष्ठावरती, अशा गोलकाच्या मी केंद्री, झुकविन माथा अनंत वेळा! अविनाशी आत्मियाशी, भांडुन तंटुन थकल्यावरती, शांत मनाने बसेन तुझिया, चरणी नाथा अनंत वेळा! ढोल तबला सुरपेटी, हीच साधने ग्रामजनांच्या, देइन हाती मैत्री करण्या, सूर ताल अन लय शब्दांशी; नृत्य संगीत शिकाया, बडवित टिपरी टिपरीवरती, ऐकत राहिन आत आतला, तै तै था…

  • जरी जाहल्या, कैक चुका – JAREE JAAHALYAA KAIK CHUKAA

    प्रियच आहे, अजुन मला मी, जरी जाहल्या, कैक चुका अचुक दाबे, गुप्त कळा मी, जरी जाहल्या, कैक चुका स्वरुपसुंदर, फूल कन्यका, पुत्र गुंड मम, पुरुषार्थी सतत गाता, खुला गळा मी, जरी जाहल्या, कैक चुका सलिल वाहे, मम काव्याचे, प्रेम वाटण्या, हर्षभरे सत्य आहे, नव्हे बला  मी, जरी जाहल्या, कैक चुका गिरव गझला, मुक्त कराने, अर्थ…

  • ऐसा लौकिक – AISAA LOUKIK

    स्त्री रत्नाचा ऐसा लौकिक कनक कोंदणी जैसा मौक्तिक लौकिक मौक्तिक असेल भौतिक बाल मनाला त्याचे कौतिक हृदय मंदिरी देव कैक पण शुद्धात्म्याचा थाट अलौकिक अंतरात जरी मूढ गूढता मृदू कुणाची वचने मौखिक विशुद्ध भक्ती ज्ञान देतसे अनुभूतीचा प्रत्यय मौलिक मात्रावृत्त(८+८ =१६ मात्रा)

  • गरज – GARAJ

    गझल कसली बालिकाही गिरवते बाराखडी वाचताना भासतेही चांदण्यांची फुलझडी चांदणे फुलवीत जाते मुग्ध माझी भावना काव्य मग घेऊन येते रंगलेली गुलछडी गझल माझी मौन घेते लाविते दारा कडी शेर माझे कोंडलेले तापले काढा कडी तापल्यावर शब्द पुद्गल अर्थसुद्धा पांगले भाव सुंदर जाणणारी हीच ती असते घडी निर्जरेने प्राण माझा मोकळा झाल्यावरी गरज ना दारास माझी…

  • पाणी – PAANEE

    गोठुन पाणी हिमनग बनतो। तापुन उकळुन तो ढग बनतो।। वाऱ्यासंगे मेघ विहरतो। जणू नभातिल तो खग बनतो।। धवल व्हावया जलद धावतो। नक्षत्रातिल तो धग बनतो।। शुभ्र मेघना वायू वरतो। शीतल अवखळ तो मग बनतो।। वस्त्र विजेचे घन पांघरतो। तडतड वर्षत तो टग बनतो।। मात्रावृत्त (८+८ =१६ मात्रा)

  • रात्र सरावी – RAATR SARAAVEE

    This ghazal is written in akshargan vrutt. Vrutt is GAA GAA GAA GAA, GAA GAA GAA GAA. शुभ्र मृदू फुलवात वळावी हीच नवी सुरुवात ठरावी भिजवुन वाती शुद्ध घृताने मम ठिणगीने ज्योत फुलावी धवल कळ्या घन समईमधल्या पेटत जाता रात्र सरावी सम्यक्त्वाची  नजर मिळाया माझी काया पणती व्हावी देव्हाऱ्यातिल शुचिता जपण्या आज ‘सुनेत्रा’ खास दिसावी…

  • कळते वळते – KALATE VALATE

    This ghazal is written in maatraavrutt(32 matraas). Here Radeef is valate(वळते) and kaafiyaas are kalate, falate, jalate( कळते, फळते, जळते) etc. नीर क्षीर जे विवेक जपती त्यांची भाषा कळते वळते कुरुप मनाची कुरुप गोष्टही त्यांच्यासंगे फळते वळते शब्दांमध्ये भरून कटुता कुणी भिजवुनी तयांस पिळता पीळ काढुनी ऊन देउनी वीष त्यातले जळते वळते मधुर भावना मुग्ध…