Tag: Marathi Ghazal

  • वनहरिणी – VANAHARINEE

    This ghazal is written in maatraavrutt. Here radeef is Malaa( मला ) and kaafiyaas are laagel, vaatel, saangel(लागेल, वाटेल, सांगेल) etc. इतुके रोखुन पुरे पाहणे, नजर तुझी लागेल मला जरी रांगडी मी वनहरिणी, लाज किती वाटेल मला रोमांचांनी फुलेल काया, बघता बघता बिंब तुझे अन हृदयीचा दिडदा दिडदा, मंत्र णमो सांगेल मला जलवंती मी निर्झरबाला,…

  • सुनेत्रा – SUNETRAA

    This ghazal is written in akshargan vrutt. vrutt is LA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA GAA. तुला मी मला तू अता आवडावे तुझे नाव माझ्या पुढे मी लिहावे जुनी प्रेमपत्रे गुलाबी मनाची वहीतून फोटो बुके पाठवावे पुराणातल्या त्या कथा वाङ्मयाचे दुधी वांगियासम भरित मी करावे जिला ना कळाली अहिंसा फुलांची…

  • तुझी भावली मी – TUZEE BHAAVALEE MEE

    तुला भावलेली तुझी भावली मी तिची कैक रूपे तुला दावली मी कधी नोट कोरी कधी येन डॉलर अधेली रुपाया कधी पावली मी पहाटे सुगंधी मृदू साद येता मधुर लाजलेली गुलबकावली मी कुमारी सडा शिंपिता सांजवेळी तिच्या अंगणी रंग-पुष्पावली मी गळाभेट होता नव्या जाणिवेची दिवाण्या मनाची निळी सावली मी वृत्त – ल गा गा, ल गा…

  • दवबिंदुंची निर्मळ भाषा – DAVBINDUNCHEE NIRMALH BHAASHAA

    दवबिंदुंची निर्मळ भाषा कुठे कुणाला कळते आता बोलीमधली अस्सल गाथा कुठे कुणाला कळते आता केंद्रच नाही ठाउक ज्याला तोच ठरवितो दिशा अताशा उजवासुद्धा असतो डावा कुठे कुणाला कळते आता अंतरातल्या मायेला जो कपट ठरवितो तो शब्दच्छल कोण काळ अन कोण विधाता कुठे कुणाला कळते आता घाई घाई करून खाई क्षुधा तयाची भडकत जाई कशामुळे ही…

  • सम्यग्दर्शन – SAMYAGDARSHAN

    सम्यग्दर्शन नाजुक अंकुर जादू त्याची खरी खरी हृदयामधली शमवी गुरगुर जादू त्याची खरी खरी दिवा अंतरी उजळे सुंदर ज्ञान आपुले झळाळण्या चारित्र्याचा तेवे कापुर जादू त्याची खरी खरी गुरे वासरे कुरणामध्ये अभय होउनी चरताना मंजुळ वाजे गळ्यात घुंगुर जादू त्याची खरी खरी नाद अनाहत गाभाऱ्यातिल जेंव्हा जेंव्हा घुमे खिरे शिल्पी घडवी मंदिर गोपुर जादू त्याची…

  • नाजुक सुंदर फूल मोगरा – NAAJUK SUNDAR FOOL MOGARAA

    नाजुक सुंदर फूल मोगरा जिनचरणीची धूळ मोगरा कृष्णाचे गोकूळ मोगरा तीन विटांची चूल मोगरा मुक्तीचा सोपान निवृत्ति ज्ञानीयांचे कूळ मोगरा पुष्पांना नवरंग द्यावया कुंकुम वर्णी चूळ मोगरा उदक सुगंधी अभिषेकाचे त्यात नाहते मूल मोगरा धूरच नाही ऐसे वाहन त्या गाडीचा रूळ मोगरा नक्षत्रांच्या हस्तीसाठी झुळझुळणारी झूल मोगरा किरणांमधुनी धबाबणाऱ्या वाग्देवीचे मूळ मोगरा गोधूलीसम गौर औषधी…

  • भृकुटीवरचा – BHRUKUTEEVARACHAA

    भृकुटीवरचा तीळ आवडे वळणदार तव पीळ आवडे भरवतेस मज प्रेमभराने शब्द तुझा मग गीळ आवडे मुक्त पाखरू उडे बागडे तुझी वारिया शीळ आवडे करून गुन्हे थकती त्यांना लपावयाला बीळ आवडे सफेद कपड्यांना तू माझ्या घातलीस ती नीळ आवडे मोहांधांच्या पायामध्ये बसवलीस ती खीळ आवडे मात्रावृत्त – ८+८ =१६ मात्रा