-
मोक्ष हवा – MOKSH HAVAA
पुरे जाहली, अता परीक्षा, मोक्ष हवा मज, मोक्ष हवा लपले त्यांना, देण्या शिक्षा, मोक्ष हवा मज, मोक्ष हवा मुला-फुलांना, सुखी ठेवण्या, प्राणपणाने, लढेन मी सत्य जाणण्या, उपाय दीक्षा, मोक्ष हवा मज, मोक्ष हवा बांध घालण्या, स्वैरपणाला, हवेच शासन, धर्माचे प्रत्येकाला, सुंदर कक्षा, मोक्ष हवा मज, मोक्ष हवा जपती सारे, जीव जिवांना, हाच स्वर्ग रे, असे खरा…
-
अंतर श्रावण – ANTAR SHRAAVAN
आलाय देखणा अंतर श्रावण आभाळ मंदिरी झुंबर श्रावण झोकात चालल्या ललना मोहक घाटात पाहण्या सुंदर श्रावण सांजेस सावळी पणती तेवत कानात बोलते मंतर श्रावण श्रद्धेस, आंधळ्या, नजरा डसता अंधार फोडतो कंकर श्रावण ज्येष्ठात रंगता गायन वादन आषाढ संपता नंतर श्रावण वृत्त- गा गा ल, गा ल गा, गा गा, गा गा.
-
करेल ज्योत दीपदान – KAREL JYOT DEEP DAAN
कराच आज दीपदान स्मरून शुद्ध दीपदान प्रसन्न मंदिरात मूर्त करेल ज्योत दीपदान तुझे किती सतेज मौन ठरेल प्रीत दीपदान मला दिसे फुला-फळात पराग बीज दीपदान अवस पुनव जरी असेल सुनेत्र आम्र दीपदान वृत्त – ल गा, ल गा, ल गा, ल गा ल.
-
पहाट गाणे – PAHAAT GAANE
भाळावरी नभाच्या, पूर्वेस चंद्रकोर; जाळीतुनी ढगांच्या, हसते सकाळ भोर. गाई भारद्वाज, त्याचे पहाट गाणे; फुलली प्रभात हसरी, नाचे मनात मोर.. चारोळी-मात्रा,तेवीस(२३)
-
तुटले कधीच नाही – TUTALE KADHEECH NAAHEE
मी गोठले तरीही फुटले कधीच नाही अन तापले तरीही विरले कधीच नाही टाळून अडथळ्यांना वेगात धावताना ध्येयास गाठले पण पडले कधीच नाही बागेतल्या फुलांचा भरला सुगंध हृदयी सौंदर्य प्राशिताना ढळले कधीच नाही भव-सागरात वेडी उडवून लाट जाता काठावरीच आले बुडले कधीच नाही मिटवून इंद्रियांना मी ताणता मनाला आले नभात फिरुनी तुटले कधीच नाही मोडून लाज…
-
माझे स्वतंत्र गाणे – MAAZE SWATANTRA GAANE
गाऊन मी लिहावे माझे स्वतंत्र गाणे रंगात चिंब न्हावे माझे स्वतंत्र गाणे भय वासना कशाला? मिटवून प्रश्न आता प्रेमात विरघळावे माझे स्वतंत्र गाणे गावोत पाखरे अन फुलपाखरे उडावी त्यांच्यापरी झुलावे माझे स्वतंत्र गाणे मम शब्द नाचणारे फुलवोत भावनांना मौनासही कळावे माझे स्वतंत्र गाणे प्राशून स्नेह प्रीती फुलवात तेवताना उजळून लख्ख जावे माझे स्वतंत्र गाणे
-
बाहुल्या – BAAHULYAA
बाहुल्या नाचल्या सावळ्या गाजल्या मेघना वर्षल्या तारका हासल्या मधुर ज्या लाजल्या कंकणा वाजल्या लक्षुमी पावल्या बालिका बोलल्या गायिका गायल्या सुंदरी छुमकल्या चंचला तापल्या चंदना घासल्या माधुरी प्यायल्या अमृता गोठल्या बावऱ्या जागल्या केतकी टोचल्या कुंतला झोंबल्या कोकिळा कुहुकल्या माधवी बिलगल्या दामिनी प्रकटल्या शुभ्र त्या झळकल्या चांदण्या बरसल्या श्रावणी रंगल्या अश्विनी बहरल्या यामिनी उजळल्या शैलजा बैसल्या सुप्रिया…