Tag: Marathi Ghazal

  • उजळ – UJAL (BRIGHTER)

    मार फडके व्हावया ऐना उजळ नित्य बस ध्यानास आत्म्याला उजळ अर्थ तव येईल हाती भरभरुन भरत जा आभाळ गगनाला उजळ तू नको घालूस चष्मा ती म्हणे करितसे मेकप दिसायाला उजळ का बरे ऐकू अशी तव बात मी मज मला कळते भले व्हाया उजळ आगमांना कोळुनी प्याल्यावरी तळ सुनेत्रा जाहला माझा उजळ

  • तापत्र – TAAPATRA (FINANCIAL CRUNCH)

    जुने पुराणे पत्र गझल नूतन जणु सावत्र गझल निमित्त्य ठरले तव जन्मा बहर काफिया छंद गझल ताप तापता संसारी शांत करे तापत्र गझल बहीण आजी माय सुता सई रदीफ कळत्र गझल तिसरे दुसरे त्याआधी प्रथम सुनेत्रा सत्र गझल शब्दार्थ … तापत्र – कडकी कळत्र – पत्नी,स्त्री

  • सावळे – SAVALE (DEEP)

    मौन टिपण्या सावळे मी मौन झाले माझिया जीवासवे मी मौन झाले चंद्र गोलाकार बघुनी भाकरीचा जाणत्या बकरीपुढे मी मौन झाले जाहले नेते शिकारी गर्जणारे रान ते किंचाळले मी मौन झाले रंग काळा अशुभ लेश्या काळगेले अंकशास्त्री बरळले मी मौन झाले गुंफुनी नावा ‘सुनेत्रा’ शेर लिहिता गुरु गझल घन बरसले मी मौन झाले

  • वाडा – VADAA (BIG TRADITIONAL HOUSE)

    जाहला गोठ्यात वाडा द्रव्य साही खांब भारी अंगणी गातात पक्षी डोंगरी बाबू जमाली हे उसाचे शेत गाते पूर्व पश्चिम जोडणारी उत्तरेला दक्षिणेची साथ मिळता सौख्य दारी

  • भाकीत – BHAKIT (PRESAGE)

    हातावरील रेषा रेखून राम गेला वेळेत वेळ अपुली पाळून काळ गेला जगणे सवंग होता करतात खेळ कर्मे परधर्म बघ भयावह सांगून कृष्ण गेला पंचांग तू स्वतःचे लिहिण्यास शीक मनुजा रद्दी विकून नोटा लाटून टोळ गेला लोण्यासमान जमिनी झरत्या झळा उन्हाच्या बहरात ग्रीष्म आला कढवून तूप गेला मम शब्द ढगफुटीसम तू झेलता सुनेत्रा भाकीत भेकडांचे उडवून…

  • लवंग – LAVANG (CLOVES)

    लवंग …आणि दोन मुक्तके लवंग जशी आमटी मस्त कटाची तवंग द्रव्यावरी तुझी तुला लखलाभ प्रसिद्धी सवंग द्रव्यावरी भावमनाची होडी आली तरून काठावरी अर्घ्य द्यावया पुष्प वाहिले लवंग पाण्यावरी धाव जपणे स्वभाव अपुला काव्यास पण जपावे वृत्तात मांडताना काव्यास पण जपावे घन शब्द अंतरीचे वाऱ्यासवे हलूनी शेरात धाव घेता काव्यास पण जपावे केतू शनी असो वा…

  • आरारुट – AARARUT

    निर्मल मानस लुटते मी णमो णमो पुटपुटते मी पाप पुण्य तोलते तुला शून्य बनूनी सुटते मी अलगद फिरवुन बत्त्याला खली वेलची कुटते मी जलद दाटता गच्च नभी जशी ढगफुटी फुटते मी बंधमुक्त होऊन जगे ताणत नाही तुटते मी पचावयाला बाळांना हलके आरारुट ते मी पाण्यावर फिरवुन बोटे सहज उमटते स्फुट ते मी