-
जिन राहतो – JIN RAAHATO
जिन राहतो माझ्यासवे माझ्या घरी मम अंतरी सांगू कशाला हक्क पुद्गल सांडल्या शब्दांवरी मी पाहिल्या अन ऐकल्या गोष्टी किती भूतातल्या पण वर्तमाना जागते जगण्या कथा लिहुनी खरी मधुचंद्रमा पूर्णाकृती माथ्यावरी घन सोबती दुग्धातल्या बिंबासही भिजवावया आल्या सरी फुलुनी कळ्या गंधाळता जाईजुईचा ताटवा कोजागिरीच्या अंगणी शांती इथे नांदे खरी मौनातली झाडे पुन्हा करतात जेव्हा लावणी येते…
-
सुंदरता – SUNDARTAA
मोर नाचतो नाचनाचतो भूमीवरती राजहंस पण जळी विहरतो भूमीवरती राजहंस वा मोर असूदे जीवच दोघे सुंदरतेला जीव जाणतो भूमीवरती
-
मयुरवाहिनी – MAYUR VAAHINEE
मयुरवाहिनी सरस्वती शारदा सुंदरी मयुरवाहिनी वीणा पुस्तक शीलधारिणी मयुरवाहिनी मोरपिसांच्या पिंछीचा मृदु स्पर्श मुलायम जागवितो तव सयी अंतरी मयुरवाहिनी काळ्या कोऱ्या पाटीवरती नऊ रसांच्या रेषा तोलत उभी लेखणी मयुरवाहिनी जललहरींचे वसन धवल घन दले गुलाबी कंच पाचु तनु मनगट हळदी मयुरवाहिनी चित्र रेखुनी फुलवेलीचे रंगबिरंगी कलम टेकवुन उभी पद्मश्री मयुरवाहिनी करात नाजुक स्फटिक मण्यांची माला…
-
अंगठा – ANGTHAA
अंगठा… हिरवी पाने पसाभर आत्महिताचा वसा वर शक्य झाल्यास सहज तू भ्रष्ट राज्य खालसा कर परत परत पाड नाणी रिक्त झालाय कसा तर गुंफुन सयी बकुळ फुले घाल गळा छानसा सर आयुष्याचं सोनं झालं जपत अंगठा ठसा धर
-
हुमान – HUMAAN
कोडे कसले हुमान हे तर माझ्यामधले इमान हे तर गगन भरारी घडवायाला दारी आले विमान हे तर लपवुन काही कशास ठेवे मला दावते गुमान हे तर मन माझे मज मुक्त सोडते करे न कधी अनमान हे तर भरून माझ्या अंतरात रे सदैव राखुन मान हे तर अश्रू नेत्रांमधून गाळू काम करूया किमान हे तर सामानावर…
-
ऑथर – AUTHOR
घडा पूर्ण घडवून पॉटर गडे भरायास आलाय वॉटर गडे गझल जाहली आज टॉपर गडे कळे अंतरातील पॉवर गडे पुरे काफिये हे मिरवणे गडे नवा घेच बँकेत लॉकर गडे लिहायास झाले कलम मोकळे खरी जाहले बेस्ट ऑथर गडे कशाला विळ्या अन सुऱ्यांचा जथा मिळे सांबरायास चॉपर गडे सुळसुळाट मोबाइलांचा जिथे उभा रेंज मिळण्यास टॉवर गडे धरेवर…
-
खोडी – KHODEE
जरी चिडविले कुणावरुन पण खोडी थोडी खरी हवी कोण कुणाच्या गोष्टी सांगे त्यातिल गोडी खरी हवी कुणा धबधबा कुणास अभयारण्य पावते खरेच का आत्मधर्म रथ पुढे न्यावया उमदी घोडी खरी हवी खरडत झरझर बघून कॉपी बखरीमधुनी करताना इतिहासातिल सत्य जाणण्या पळती मोडी खरी हवी शतजन्मांतिल नातीगोती कशास स्मरणे या जन्मी धन्य व्हावया मनुज जन्म मम…