Tag: Marathi Ghazal

  • मसाज – MASAAJ

    हाताने कर मसाज चेंडू घरातले कामकाज चेंडू गुगलीवरती षट्कारास्तव उसळुन फळीवर गाज चेंडू मोजिन टप्पे झाकुन डोळे ठोकत फरशीस वाज चेंडू बिंब स्वतःचे स्वतःत बघण्या मला कशाची न लाज चेंडू कसे जगावे आनंदाने शिकव जगूनी रिवाज चेंडू लय मस्तीचा धरून ठेका मनापुढे पढ नमाज चेंड भोगरोग जर छळतो वृद्धां शोध तयावर इलाज चेंडू अनवट कोडे…

  • मळ्या रे – MLYAA RE

    नको अळू तू स्वतः तरीपण ढगांस श्यामल अळस मळ्या रे गगन गिरीच्या नक्षत्रांची वार्ता मजला कळस मळ्या रे धरे क्षीरधर अखंड धारा डोंगरमाथी कुरळ कुंतली दुग्ध तपविता किरण रवीचे सांजेला ते हळस मळ्या रे हिमवृष्टी करतात जलद अन निळ्या पहाडा नमिता चपला उजळे कातळ गाढ झोपला सत्वर त्याला यळस मळ्या रे मुक्त ओंजळी उधळत धो…

  • स्फटिक – SFATIK

    मोरचुदाचे स्फटिक उडाले घनमालेतुन परतुन आले मेंदीच्या गंधाचा शिरवा प्राशुन भुंगे वेडे झाले काव्याच्या किमयेने भिजल्या हृदयामधले मिथ्य गळाले खडकांवर वर्षाव करूनी त्यागुन काया मेघ निघाले झिम्मा फुगडी घालत वारा फांदीवरती पिंगा घाले

  • टेच – TECH

    म्हणतात खेच बाही टळण्या बळेच काही माझेच मज मिळाले फुकटात टेच नाही पाऊस हा असाकी फुटले घडेच दाही बदलव स्वतः स्वतःला पंचांग पेच वाही प्रत्येक दिस निराळा घडते न तेच माही होईल तव अहंची लागून ठेच लाही गझलेतुनी बरसतो तो मोद वेच राही

  • हैदोस – HAIDOS

    वादळाने घातला हैदोस कारण जांभळांचे पक्व झाले घोस कारण का असा पाऊस वाऱ्या कावलेला कावण्याचे दे मला तू ठोस कारण हे असे मौनात जाती मेघ अवचित मूग गिळण्याचा मिळाला डोस कारण का बरे ते टाळताती बोलण्याला इभ्रतीचा जीवघेणा सोस कारण ही अशी फुगलीत नगरे माणसांनी जाहल्या वस्त्या नि वाड्या ओस कारण कापले तू अंतराला फक्त…

  • लोड – LOD (LOAD)

    चाळणे मातीस आता सोड दोस्ता माय माती लाल काळी गोड दोस्ता रंगरूपाचीच चर्चा बोर करते तू मनाला आत्मियाशी जोड दोस्ता तोच डोंगर घाट सोपा जाहल्यावर घेच आता वेगळा तू मोड दोस्ता बांधुनी पद्यात तत्वे टेस्ट केली घे लिहाया गुणगुणुनी कोड दोस्ता शेवटाचा शेर येता नाव माझे गुंफण्याची सवय आता छोड दोस्ता आवडे मज नाव माझे…

  • मध्यरात्री – MADHYARAATREE

    आयुष्य तेच नाही हे ही खरेच आहे आहे तसेच काही हे ही खरेच आहे पंख्यास एक पाते कुरकूर ना तरीही वारा बळेच  वाही हे ही खरेच आहे आवळु नको खिळ्याला ठोकून बसव त्याला त्याच्यात पेच नाही हे ही खरेच आहे अवसेस मध्यरात्री मजला धरा म्हणाली अंधार वेच राही हे ही खरेच आहे हातात येत नाही…