-
कन्यादान – KANYAA DAAN
लग्नविधीतिल शब्द खटकतो कन्यादान कन्या म्हणजे वस्तू नाही आत्मा जाण हात असावा हातामध्ये कशास गाठ विसरुन ओट्यांची गाठोडी व्हावे गान स्वतंत्रता आत्म्यांची जाणुन द्यावी साथ परंपरेतिल अस्सल जपण्या यावे भान मैत्री प्रीती दोन जिवांची वाढायास कर्तृत्वाने वाढो दोन्ही घरची शान प्रत्यंचा धनुराची ताणुन धरता नेम मुक्तिपथावर ऊर्ध्वगतीने जातो बाण
-
टीप – TEEP
एक कांचनी क्लीप झळाळे एक सुवर्ण सुदीप झळाळे शालूवरती कनक वल्लरी एक अक्षरी टीप झळाळे पेन लाकडी पण सोन्याचे एक त्यावरी नीप झळाळे हेम चंपकी बनी सुगंधी एक जलाचा पीप झळाळे छेडायाला कुंदन तारा एक विजेसम बीप झळाळे
-
डर – DAR
जीव स्वयंसे नाहि हरता ना डर लगता शरीर से वो नाता रखता ना डर लगता पुछताछ करनेको किसकी कुछ कुछ पाकर जब जब खुद वो खुदसे डरता ना डर लगता
-
चंचल बाला – CHANCHAL BAALAA
हौदात जलावर धरता साय कधी पाहून सुखाने हसते माय कधी ती चंचल बाला बनुनी खळखळता पाऊस उतरतो धरण्या पाय कधी
-
रोजरोजचे – ROJ ROJACHE
कशास आता जाबसाल ते रोजरोजचे उतरुन ठेवू सांग मनाला बोझ रोजचे नसलेलेही दिसते आणि बिंब उमटते हृदयजलावर किती फुलांचे मोज रोजचे
-
जगत – JAGAT
मी गुणगुणते जे गाणे आहे माझे माझ्यातुन उमले ते ते सारे माझे मी माझे माझे म्हणत राहिले जेव्हा पाहिले जगत मी अवती भवती तेव्हा
-
निर्मल – NIRMAL
मी लिहीत आहे मुक्तक गझला गाणी झुळझुळते गाते त्यातील निळसर पाणी पाण्यावर डुलते एक कागदी नाव गाठण्या स्वप्नीचे निर्मल सुंदर गाव