-
निळी तिचाकी – NILEE TICHAKEE
खिडक्या दारांमधून येतो नाचत वारा घरात माझ्या ऊन कोवळे सोनसळीचे लहरत फिरते उरात माझ्या कधी कावळा कधी पारवा हक्काने अंगणात येतो पानांमध्ये लपून कोकिळ सूर मिळवितो सुरात माझ्या फुलका भाकर रोट चपाती दशमी पोळी खाऊ घालिन पीठ मळाया स्वच्छ दांडगी कट्ट्यावरती परात माझ्या निळी तिचाकी निळीच छत्री निळा सावळा घन ओथंबुन अजूनसुद्धा टिकून आहे आठवणींच्या…
-
बंधमुक्त – BANDH MUKT
प्रतिभेने मज माध्यम दिधले काव्य व्यक्त व्हावया अंतर म्हणते लिही लिही मन बंधमुक्त व्हावया प्रिय मज माध्यम काव्यच आहे अन्य माध्यमाहुनी भजते जपते शब्दाक्षर मी काव्यभक्त व्हावया काळोखाला उसवुन रगडुन घडीव पाट्यावरी गाळत बसते भाव गडद मी स्वच्छ रक्त व्हावया पहाट सुरभित शीतल शुभ्रा प्रसाद देण्या शुद्ध ओंजळीत मम दव सांडविते एकभुक्त व्हावया झरते पडते…
-
सोय – SOY
मौन जपे मी काव्यामध्ये जरी भासले तेव्हा कोणा मरगळल्यासारखी मॅड मला घनचक्कर म्हणता शब्दकळा गोठवीत गेले साकळल्यासारखी शब्दकळेला वा भावांना स्वतःच सुंदर कुरुप बनविता पाहुन अपुली सोय साधे सोपे नियम पाळण्या घडीत नाही नाही म्हणता घडीत म्हणता होय
-
गझनीत – GAZNEET (SONNET)
सुरभीतराई हळद माखुनी कनकलता भासे गिरवून मात्रा जलद सावळ्या सलिलसुता भासे अडवून वाऱ्या गडद रांगड्या सळसळता पर्णे समशेरधारी रजत दामिनी रण दुहिता भासे कदली दलांच्या हरित मांडवी अनवट कोड्यांनी लय सूर ताली भरुन सांडण्या घट हलता भासे वसने दिशांची घन निळे धुके मलमल बाष्पाची विखरून देता किरण तांबडा कलश रिता भासे पिवळ्या जमीनी कुरण जांभळे…
-
अक्षर मोती – AKSHAR MOTEE
नकोच काही देणेघेणे लिहावी छान मी गझल फुलपाखरासम उडायाला विणावी छान मी गझल उडून उडून दमल्यावरती चित्रात रेखण्या तिला चिमटीत सान पकडुन पंख धरावी छान मी गझल अंगणातल्या दोरीवरती वाऱ्यात सुकवायाला बुडवून वाहत्या निर्झरात पिळावी छान मी गझल भूचक्रासम गरगर फिरण्या तेलात सोडून उष्ण तांबूस लाल खुलाया रंग तळावी छान मी गझल झुळझुळ पहाट वाऱ्यासंगे…
-
केव्हातरी मिटाया – KEVHAATAREE MITAAYAA
केव्हातरी मिटाया मज लागणार डोळे ढाळू नकोस अश्रू मम तेवणार डोळे शब्दांस गोल झाल्या लावून धार डोळे बनुनी कलम दुधारी करणार वार डोळे पत्रे उडून जातिल कर अंगणात गोळा पत्रांवरी पहाटे दव ओतणार डोळे माती तरूतळीची बकुळीस गोष्ट सांगे माझे तुझे मिळूनी होतील चार डोळे नेत्रांस दान करुनी दृष्टी दिली कुणाला ठाऊक ना जरी हे…