Tag: Marathi Ghazal

  • सृष्टीची जान – SRUSHTEECHEE JAAN

    आपट्याचं पान सोन्याची खाण आपट्याचं पान शेवाळी वाण ओरबाडु नका आपट्याचं रान आपट्याचं रोप किती किती सान आपट्याचं जपू वाढाया छान आपट्याचं झाड बागेची शान वृक्ष वल्लरीत सृष्टीची जान

  • डोरले – DORALE

    पर्व दशलक्षण दिगंबर जैनियांचे थोरले मी त्याचसाठी भावनेतिल अर्थ सुंदर खोरले मी साधका आत्माच साधन शुद्ध निर्मल जाणल्यावर मम मनाच्या आगमातिल शब्द दडले चोरले मी भूक्षमा अन मार्दवादी धर्म दाही पाळणाऱ्या भूतकालिन मुनिवरांचे शिल्प दगडी कोरले मी भक्तिपूर्वक अष्टद्रव्ये अर्पिल्यावर जिनप्रभूला शांतता मजला मिळाली झोपल्यावर घोरले मी ज्ञान श्रद्धा शील सम्यक तीन शेरांची गझल ही मिरविण्या…

  • अंधश्रद्ध – ANDH-SHRADDH

    पराधीन होतो प्राणी कर्मबद्ध होतो कर्म रोखुनी जाळूनी तोच सिद्ध होतो सहज मैत्र जुळते जेव्हाअहं गळुन जाई द्वैत संपुनीया जाता भाव शुद्ध होतो पाच पांडवांची पत्नी एक द्रौपदी हो सत्यकथा याला म्हणता धर्म क्रुद्ध होतो आत्महिता जपण्यासाठी जीव दक्ष सैनी परहित पण करता तपता बंध वृद्ध होतो पंथवाद प्रिय भोग्यांना जाण मानवा तू मनुज क्षुद्र…

  • जगण्याची रे गंमत घे – JAGANYAACHEE RE GAMMAT GHE

    असो चाळिशी वा पन्नाशी जगण्याची रे गंमत घे साठी बुद्धी नाठी खाशी जगण्याची रे गंमत घे विशीतल्या गुजगोष्टी स्मरुनी काव्य प्रीतिचे नवे रचू घड्याळ बांधू बारा ताशी जगण्याची रे गंमत घे सम्मेदाची यात्रा केली श्रवणबेळगोळा गेलो कशास आता हाजी काशी जगण्याची रे गंमत घे रानपाखरांसंगे गाऊ हस्ताच्या धारेत भिजू रानी डुलते कंच कपाशी जगण्याची रे…

  • आत्माजीराव – AATMAAJEE RAAV

    आल्या ग नाचत पाऊस धारा आश्विनासंगे वाजवी पावा रानात वारा आश्विनासंगे सोवळे नेसुन जानवे घालुन मंत्रास बोले उपाध्या गुरुजी शोभतो तारा आश्विनासंगे देहात मौनी बैसला आहे आत्माजीराव गावया अधीर फोडून कारा आश्विनासंगे मातीस ओल्या आकार देण्या हस्त हे माझे पाडण्या बुंदी धरतात धारा आश्विनासंगे काव्यात झरझर नाव गुंफाया कवयित्री तुझे शाईचा गाढ उतरेल पारा आश्विनासंगे…

  • घोळ – GHOL

    माझिया पिंडात जे जे तेच ब्रह्मांडात रे कांडले शब्दांस कारण निर्मिती कांडात रे तू सुपारी घेतली अन घाव घालुन फोडली गुण सुपारीचेच अवघे जाण या खांडात रे मुसळ ना केरात जाते मुसळ हे माझे उभे म्हण नको शब्दात पकडू घोळ थोतांडात रे मागते जिव्हा म्हणोनी मांस खाण्या माणसा मूक प्राण्या मारिशी तू जीव बघ सांडात…

  • पानाभवती – PAANAA BHAVATEE

    छुमछुम छुमछुम पैंजण वाजे पानाभवती उदक सुगंधी दवबिंदूंचे पानाभवती पदन्यास कलिकांचे पाहुन दिशा उजळता कुंदफुलांसम गझल डोलते पानाभवती चिंब वल्लरी हळद माखली फुले सुगंधी परिमल प्राशुन वारा नाचे पानाभवती झरझर विणते घालित टाके पाऊस धार सळसळणारे अक्षर पाते पानाभवती आरसपाणी पान भुईचे तयात अपुले बिंब पाहण्या गगन उभे हे पानाभवती गझल मात्रावृत्त (मात्रा २४)