Tag: Marathi Ghazal

  • कातळ – KATAL (BEDROCK)

    नको अळू तू स्वतः तरीपण ढगांस श्यामल अळस मळ्या रे गगन गिरीच्या नक्षत्रांची वार्ता मजला कळस मळ्या रे धरे क्षीरधर अखंड धारा डोंगरमाथी कुरळ कुंतली दुग्ध तपविता किरण रवीचे सांजेला ते फळस मळ्या रे हिमवृष्टी करतात जलद अन निळ्या पहाडा नमिता चपला उजळे कातळ गाढ झोपला सत्वर त्याला यळस मळ्या रे मुक्त ओंजळी उधळत धो…

  • स्फटिक – SFATIK (CRYSTALS)

    मोरचुदाचे स्फटिक उडाले घनमालेतुन परतुन आले मेंदीच्या गंधाचा शिरवा प्राशुन भुंगे वेडे झाले काव्याच्या किमयेने भिजल्या हृदयामधले मिथ्य गळाले खडकांवर वर्षाव करूनी त्यागुन काया मेघ निघाले झिम्मा फुगडी घालत वारा फांदीवरती पिंगा घाले

  • टेच – TECH (PRESTIGE)

    म्हणतात खेच बाही टळण्या बळेच काही माझेच मज मिळाले फुकटात टेच नाही पाऊस हा असाकी फुटले घडेच दाही बदलव स्वतः स्वतःला पंचांग पेच वाही प्रत्येक दिस निराळा घडते न तेच माही होईल तव अहंची लागून ठेच लाही गझलेतुनी बरसतो तो मोद वेच राही

  • हैदोस – HAIDOS (RUNNING RIOT)

    वादळाने घातला हैदोस कारण जांभळांचे पक्व झाले घोस कारण का असा पाऊस वाऱ्या कावलेला कावण्याचे दे मला तू ठोस कारण हे असे मौनात जाती मेघ अवचित मूग गिळण्याचा मिळाला डोस कारण का बरे ते टाळताती बोलण्याला इभ्रतीचा जीवघेणा सोस कारण ही अशी फुगलीत नगरे माणसांनी जाहल्या वस्त्या नि वाड्या ओस कारण कापले तू अंतराला फक्त…

  • लोड – LOD (LOAD)

    चाळणे मातीस आता सोड दोस्ता माय माती लाल काळी गोड दोस्ता रंगरूपाचीच चर्चा बोर करते तू मनाला आत्मियाशी जोड दोस्ता तोच डोंगर घाट सोपा जाहल्यावर घेच आता वेगळा तू मोड दोस्ता बांधुनी पद्यात तत्वे टेस्ट केली घे लिहाया गुणगुणुनी कोड दोस्ता शेवटाचा शेर येता नाव माझे गुंफण्याची सवय आता छोड दोस्ता आवडे मज नाव माझे…

  • मध्यरात्री – MADHYARAATREE ( AT MIDNIGHT)

    आयुष्य तेच नाही हे ही खरेच आहे आहे तसेच काही हे ही खरेच आहे पंख्यास एक पाते कुरकूर ना तरीही वारा बळेच  वाही हे ही खरेच आहे आवळु नको खिळ्याला ठोकून बसव त्याला त्याच्यात पेच नाही हे ही खरेच आहे अवसेस मध्यरात्री मजला धरा म्हणाली अंधार वेच राही हे ही खरेच आहे हातात येत नाही…

  • जिवलग – JIVALAG (BELOVED)

    व्यक्त कराया भावभावना गझल लिहावी काफियातल्या अलामतीला जपत लिहावी दोस्ता जैसा रदीफ जिवलग शान वाढवी गझल कुणीही मनात गुणगुण करत लिहावी