-
अजब गजब – AJAB GAJAB
गझल गझल गज़ल गजल मस्त काव्य जाहलेय चिंब धवल मस्त काव्य शब्दरूप कुंतलात कुरळ गाठ भिजत भिजत होय सरल मस्त काव्य रंगभोर श्रावणात जलद भरुन ठिबकतेय शुभ्र सजल मस्त काव्य काफिया रदीफ सारवान एक अजब गजब अमल नवल मस्त काव्य गच्च दाटली पहाट पावसात विहरतेय त्यात तरल मस्त काव्य गझल (मात्रा १८) लगावली – गालगाल/…
-
चिमटे – CHIMATE
आयुष्याची सुंदर गाथा स्वतः लिहावी अनाथांसही करण्या नाथा स्वतः लिहावी चिमटे सोसत समीक्षकांचे गोष्ट छानशी स्वतः स्वतःच्या खाउन लाथा स्वतः लिहावी संतांसम मिळवाया शांती अंतरातली अभंग ओवी झुकवुन माथा स्वतः लिहावी ताल सुरातिल धरुनी ठेका गझल लयीतिल जपता जपता तै तै ताथा स्वतः लिहावी मायपित्यांसम गुरू मिळाया व्यथा टोचरी पदपथ अथवा बनवुन पाथा स्वतः लिहावी…
-
पट्टा – PATTAA
आवडतो मज माझा पट्टा आवळतो गज माझा पट्टा ऐन्यामधल्या बिंबामधुनी म्हणतो तू सज माझा पट्टा पाण्यामध्ये पद्म फुलाया कालवितो रज माझा पट्टा रोज नको बस्तीला जाऊ म्हणतो मज भज माझा पट्टा धुंडत आहे गझल कागदी कोरा कागज माझा पट्टा गझल मात्रावृत्त (मात्रा १६)
-
निरामय – NIRAAMAY
सुदृढ सुंदर शुद्ध निरामय जीवन सळसळणारे अमुचे अंतरातल्या मधुर क्षणांचे गायन सळसळणारे अमुचे सत्य अहिंसा प्रेम धबाबत हृदयामधुनी उसळत आहे तन मन वचनामधून मंजुळ वादन सळसळणारे अमुचे अभय जाहलो अभय कराया जीव भद्र मोक्षाचे मार्गी हरेक माध्यम काबुत ठेवे शासन सळसळणारे अमुचे बदल घडावा बदल टिकावा स्वधर्म सत्याचा टिकण्याला गुणानुरागी वारे वाहे पावन सळसळणारे अमुचे…
-
पल्लेदार – PALLEDAAR
हृदयात माझ्या हसे अतिशय अतिशय चिखलात रुते खोटा अभिनय अतिशय उघड तूच सांग अता फसलाय खेळ इतुके ग नाही बरे जनभय अतिशय आत्मबळ वाढवेल वेड दिवाने येते काय प्रिय तुला मम सय अतिशय नाचतेय मूळ खोड फुलासंगती अल्लड हे अजूनही तव वय अतिशय जमणार गझल पल्लेदार लिहाया सूर ताल जाण पकड अन लय अतिशय गझल…
-
जिवाशिवाचे मीलन – JIVAA SHIVAACHE MEELAN
सह्याद्रीच्या डोंगररांगांतुनी धबाबा धबाबणारा प्रपात सुंदर प्रेमावेगाने कोसळतो शुभ्र खळाळत खळाळणारा प्रपात सुंदर अवखळ मारुत प्रचंड ऊर्जेने भरलेला जलौघास आलिंगन देता पंख पसरुनी हटून मागे त्यास चुंबतो भरारणारा प्रपात सुंदर पंचभुतांच्या जिवंत गात्री उदकांतिल संवेग वायुचा प्रीत तोलता जिवाशिवाचे मीलन होता अखंड दौडे उधाणणारा प्रपात सुंदर गर्जत उसळत अन फेसाळत दरीस भेटे कड्यावरुन झेपावत खाली…
-
घर – GHAR
चंदेरी सोनेरी श्रावणसरी चंदेरी सोनेरी साधन सरी माझे हे सुंदर घर मुक्त होण्या चंदेरी सोनेरी तारण सरी नाचाया बहराया मुग्ध धरणी चंदेरी सोनेरी कारण सरी आत्म्याला चिंब चिंब करावयास चंदेरी सोनेरी पावन सरी आकाशी जलदातुन मौक्तिकांच्या चंदेरी सोनेरी साजन सरी गझल मात्रावृत्त (मात्रा १९, ६/६/७/)