Tag: Marathi Ghazal

  • गंधोदक – GANDHODAK

    मी आहे जादूई चुंबक खेचुन घेते सुंदर रंजक अतीव सुंदर मजला मिळते झुलावया हृदयाचा लंबक हृदय प्रीतिने भरून वाहे पूर्ण उमलला त्यातिल चंपक प्रीत दिली मी प्रीत मिळविण्या माझे रक्षक बनले कंटक रक्षक आता विश्व साजिरे गंधोदक शिंपाया भंजक

  • मानाचा श्रावण – MAANAACHAA SHRAAVAN

    मानाचा श्रावण येणार बाई मानाचा श्रावण देणार बाई हेवेदावे मनातली ग कटुता मानाचा श्रावण नेणार बाई पाऊस नक्षत्रांसम मूळ रूप मानाचा श्रावण वेणार बाई अनुराधा मघा हस्त बाळलेणी मानाचा श्रावण लेणार बाई ओंजळी भरून मौक्तिक प्रीतीचे मानाचा श्रावण घेणार बाई गझल मात्रावृत्त (मात्रा १९)

  • दिव्या-दिव्यांची अवस देखणी – DIVYAA-DIVYAANCHEE AVAS DEKHANEE

    दिव्या-दिव्यांची अवस देखणी गुणानुरागी सरस देखणी सोमवती देवीस निघाली फेडायाला नवस देखणी बालक पालक आषाढाची कथा ऐकती सुरस देखणी शुद्ध भूवरी पाऊस धार जन्मा येण्या हवस देखणी रानामध्ये बांधावरती तरारली बघ जवस देखणी गझल मात्रावृत्त (मात्रा १६)

  • नामदेव – NAAMDEV

    क्षमाशील संसद व्हावी जसे नामदेव क्षमाशील साधू जैनी तसे नामदेव संयमास धारण करुनी जिंकले कषाय क्षमाशील धरणी यक्षी असे नामदेव ठाकठोक केली निष्ठुर मूर्त बसवण्यास क्षमाशील कायेमध्ये वसे नामदेव शिव्याशाप त्यांचे त्यांना पावुदेत लक्ष क्षमाशील ओठी माझ्या बसे नामदेव संत मूळ धर्मी पावन दिगंबर नामी क्षमाशील नेत्री माझ्या ठसे नामदेव गझल मात्रावृत्त (मात्रा २३)

  • हाण – HAAN

    हाण चार थोबाडावर हाण मार थोबाडावर पाचवीस जो तू पुजला हाण जार थोबाडावर गुंफ मोगरा वासाचा हाण हार थोबाडावर रंग बदलु गिरगिट सरडे हाण ठार थोबाडावर लाव दीप नालीपाशी हाण बार थोबाडावर बेवड्यास पाजुन सरबत हाण सार थोबाडावर गात न्हात खाण्यासाठी हाण वार थोबाडावर खाज ज्यास सुटते राजस हाण खार थोबाडावर तेच षंढ छक्के आले…

  • जिनशासन गंगा – JIN SHAASAN GANGAA

    जीवनात अमुच्या अवतरली खळाळणारी पावन गंगा समृद्धीची बाग फुलाया माय मराठी साधन गंगा खरी साधना फळास आली पवनमावळी जादू झाली गझलेमधल्या मौक्तिकातुनी झरझरते मनभावन गंगा मुळा मुठा भीमा अन पवना दुथडी भरुनी संथ वाहती नीरेकाठी ध्यानासाठी घालुन बसली आसन गंगा सूर ताल अन लयीस साधत काव्यानंदी बुडवायाला मुरलीसम कृष्णाच्या गुंजे बनात नंदन कानन गंगा कैक…

  • काळे साप – KAALHE SAAP

    एक एक जपण्यास मणी मी जपले जिनदेवाचे नाम गात गात लढण्यास रणी मी जपले जिनदेवाचे नाम गात गात धरण्यास फणी मी जपले जिनदेवाचे नाम गात गात फुलण्यास वनी मी जपले जिनदेवाचे नाम हंस शुभ्र तरतात जलावर झुलते नावेमध्ये बाळ गात गात तरण्यास धनी मी जपले जिनदेवाचे नाम झोप लागली गात सुखाने स्वप्नी दिसले काळे साप…