Tag: Marathi Ghazal

  • चंदा – CHANDAA

    माधव केशव वा गोविंदा नगर पुरीचा तो तर बंदा स्टार्टर लावायाच्या आधी सुरू जाहला अवैध धंदा वाटत वाटत डाळ चण्याची तुटले बंधन चारुन कुंदा बोल लावला खोटा बाबा गळी पडूनी झाला फंदा करून उष्टा उरला सुरला बाटलीत ती भरते चुंदा उद्योगाची वाट लावुनी कोठडीत उद्योगी मंदा भूमातेचे स्वत्त्व जपाया चंद्र देतसे अभय नि चंदा गझल…

  • रोहिणी – ROHINEE

    कवितेची बनवाया छत्री आली सारी पोरे कवितेची फिरवाया छत्री आली सारी पोरे कल्पनेतली पद्ममोहिनी विद्येला भिजवाया कवितेची उडवाया छत्री आली सारी पोरे आषाढातिल मेघगर्जना ऐकुन उडता इरले कवितेची फुलवाया छत्री आली सारी पोरे रंगबिरंगी कळ्या जोडुनी मजबुत दांड्यावरती कवितेची सजवाया छत्री आली सारी पोरे मस्त रोहिणी निळ्या अंबरी इंद्रधनुष्यी बसता कवितेची झुलवाया छत्री आली सारी…

  • बंदर – BANDAR

    सुंदर सुंदर सुंदर गावे सुंदर सुंदर अंबर गावे आत्म्यांमधले प्रेम सांडता सुंदर सुंदर मंदिर गावे मात्रा मोजत अर्थ भावयुत सुंदर सुंदर मंतर गावे नद्या झरे अन त्यात नाहते सुंदर सुंदर कंकर गावे जहाज धक्क्याला लागाया सुंदर सुंदर बंदर गावे गझल मात्रावृत्त (मात्रा १६) Meaning: The ghazal presents the thought of singing with beauty and grace.…

  • भरीव – BHAREEV

    जीवन सुंदर अतीव आहे मनात मंदिर वसलेले जीवन सुंदर सजीव आहे मनात मंदिर वसलेले पहाट वारा वाहत नाचे फुले उमलली बनी वनी जीवन सुंदर घडीव आहे मनात मंदिर वसलेले भीती चिंता पोकळ साऱ्या तमात रात्री विरलेल्या जीवन सुंदर भरीव आहे मनात मंदिर वसलेले कोमल प्रमुदित भावफुलांचे सुगंध भरता मम हृदयी जीवन सुंदर वळीव आहे मनात…

  • काळ्या काळया – KAALHYAA KAALHYAA

    काळ्या काळया विठोबाला दंडवत माझा काळया काळया उजेडाला गंडवत माझा नमस्कार हातांची दो घडी घालुनीया काळ्या काळया रखुमाईस बंडवत माझा मोक्ष मिळायाला केला सत्याचा प्रयोग काळ्या काळ्या कायेवरी भंडवत माझा जीव मौनी अभय होण्या भव्य राजवाडा काळ्या काळ्या शासकांना फंडवत माझा पाहतेय श्रद्धेने मी मूर्त रूप आत्मा काळया काळया पाषाणात खंडवत माझा गझल मात्रावृत्त (मात्रा…

  • नमिते – NAMITE

    मी जे लिहिते त्यातुन सुंदर सारे निघते मी जे जपते त्यातुन सुंदर सारे निघते घास टाकुनी जात्यामध्ये भरून ओंजळ मी जे दळते त्यातुन सुंदर सारे निघते जीवांना रक्षाया अविरत सत्य जाणुनी मी जे रचते त्यातुन सुंदर सारे निघते गोष्टींमधुनी विचार शिवरुप मनी मुलांच्या मी जे भरते त्यातुन सुंदर सारे निघते ब्रह्मांडातिल अन सृष्टीतिल मम पिंडातिल…

  • ठिपके – THIPAKE

    कुरणांवरती मेंढ्या फिरती ओढ्याकाठी गळ्यातल्या घंटा किणकिणती ओढ्याकाठी निळ्या पर्वती प्रभा पसरली उजळत माथे इवले इवले ठिपके चरती ओढ्याकाठी कुठे बैसला मेंढपाळ वाजवीत पावा मऊ घोंगडे खांद्यावरती ओढ्याकाठी गवतावर फुलपाखरे जांभळ्या पंखांची पंख झुलवुनी मजेत उडती ओढ्याकाठी खळाळते जल त्या तालावर वारा गाई काठावर मासोळ्या दिसती ओढ्याकाठी गझल मात्रावृत्त – (मात्रा २४)