-
जीवनभक्ती – JEEVAN BHAKTEE (DEVOTION IN LIFE)
कटू सत्य आम्ही प्राशियले तुम्हीही प्राशून पहा पचल्यावरती पचले आम्हा असे खरे बोलून पहा जीवनभक्ती कळण्यासाठी सत्य घोळवुन माधुर्यात मृदूपणाने कसे उतरते नकळत कंठातून पहा पुण्य जाळुनी उदाधुपासम सुगंध भरता तनीमनी तपवुन देहा उपवासाने संयम गुण जाणून पहा कुणी एक जगतास फिरवितो भ्रम डोक्यातुन त्यागुनिया अंतरातल्या प्रतिबिंबाला अकिंचन्य होऊन पहा खूप जाहले शोधुन भटकुन पाषाणी…
-
थट्टा – THATTAA (DIDO)
शौच म्हणा वा शुचिता मजला स्वच्छ राहूदे फक्त मला वक्रपणा जर ना सोडे मी शिक्षा व्हावी सक्त मला भरून प्याले ओतुन प्याले करण्यासाठी रिक्त मला अता व्हायचे भूमीसाठी कोसळणारा हस्त मला मस्त दुपारी स्वस्थ झोपते कसे म्हणू रे सुस्त मला संगणकाची साथ कराग्रां होण्यासाठी व्यक्त मला जरी भावते थट्टा तुजला धर्म शोध तू त्यात खरा…
-
मधली फळी – MADHLI FALEE (MIDDLE TIER)
मारू नको फुलाला म्हणते कळी मुक्याने तोडून काचणारी पर साखळी नव्याने तू ओरडून तेव्हा केला किती तमाशा आता कशास देशी प्राणी बळी मुक्याने वाढून भरभरूनी रसदार लाल भाजी चमच्यांस पाक गोष्टी सांगे पळी मुक्याने फुकटात पाजणारे मधल्यांस डोस येता प्राशून डोस पिचली मधली फळी मुक्याने पाण्यात पोहुनीया येता वरी सुनेत्रा जाऊन गाळमाती बसली तळी मुक्याने
-
मुक्त करविले आहे – MUKT KARAVILE AAHE (HAS SET FREE)
-
डोस – DOSE
-
दीप शर्वरी – DEEP SHARVAREE (NIGHT OF LIGHTS)
श्रावण रमणी दीप शर्वरी दिवा लाविते श्रावण रमणी गोड गोजिरी दिवा लाविते पश्चिम सूर्याला वंदोनी हृदय मंदिरी श्रावण रमणी पीत पावरी दिवा लाविते अंधारे अंगण उजळाया तिन्हीसांजेस श्रावण रमणी वधू लाजरी दिवा लाविते हळदीकुंकू रेखुन भाळी तुळशीपाशी श्रावण रमणी प्रिया बावरी दिवा लाविते इंद्रधनूवर झोके घेउन दमल्यावरती श्रावण रमणी गझल नाचरी दिवा लाविते
-
माझी तरही – MAAZEE TARAHEE(MY TARHI GHAZAL)